चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

नव्या म्युटेशनमुळे कोरोना संक्रमणाचा प्रसार वाऱ्यासारखा पसरत आहे. देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. याशिवाय, राज्यातील मृतांची वाढणारी संख्या चिंताजनक असताना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि विरोधी पक्षांत चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोग्य सुविधांवरून केंद्र सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करत असल्याचा आरोप केला होता. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे आणि सातत्याने केंद्र सरकारवर बालिश आरोप करणे बंद करावे, अशी टिका त्यांनी केली आहे.

"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार अपयश लपविण्यासाठी सातत्याने केंद्र सरकारवर आरोप करत आहेत. तसेच वाद निर्माण करून कोरोनाच्या संकटापासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचे या सरकारचे प्रयत्न आहेत. राज्यातील जनता चहुबाजूंनी संकटात सापडली आहे. मात्र, तरीही महाविकास आघाडीचे राजकारण सुरु आहे. नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर औषधाबाबत काल केलेला आरोप बालिश आणि हास्यास्पद आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडिसिवर विकण्यास सोळा कंपन्यांना मनाई केली, असा धादांत असत्य आरोप त्यांनी केला. त्यासाठीचे पुरावे मागितले तर, त्यांनी ते दिलेले नाहीत", असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Shiv Sena MLA Sanjay Gaikwad: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वक्तव्य म्हणाले “करोनाचे जंतू सापडले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते”

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. राज्यात काल 67123 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 56783 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3061174 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 647933 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.18% झाले आहे.