Maharashtra Weather Forecast: अवाळी पाऊस हजेरी लावण्याच्या मनस्थितीत, पुढचे 48 तास महत्त्वाचे; जाणून घ्या हवामानाचा अंदाज
Weather Forecast | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मिचॉंग चक्रीवादळ (Cyclone Michaung Update) आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यात आपला प्रभाव दाखवत आहे. दरम्यान या चक्रीवादळाचा परिणाम देशातील इतरही विविध राज्यांमध्ये पाहायला मिळतो आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातही हा प्रभाव पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खास करुन विदर्भ आणि मराठवाड्यात आज (6 डिसेंबर) अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या सात डिसेंबर म्हणजेच उद्यापर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचीही शक्यता, असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

पुढचे पाच दिवस महत्त्वाचे

विदर्भ आणि मराठवाड्यात पुढचे पाच दिवस महत्त्वाचे असणार आहेत. त्यातही पुढच्या 48 तासांमध्ये विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे. या काळात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यांसह पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. कास करुन नांदेड, सोलापूर, उस्मानााद, अहमदनगर, लातूर भागात अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पाच आणि सात डिसेंबर रोजी हवामान अंशत: ढगाळ राहू शकते. शिवाय काही ठिकाणी हलक्या ते मध्य स्वरपाच्या पावसाच्या सरीही कोसळू शकतात. आठ आणि नऊ डिसेंबरला मात्र हवामान पूर्णपणे कोरडं राहू शकतं, असं हवामान विभागाने म्हटले आहे. (हेही वाचा, Unseasonal Rain: अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अंदाजे 99 हजार 381 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश)

मुंबई आणि कोकणमध्ये मात्र हवामान कोरंड

विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज असला तरी मुंबई आणि कोकणमध्ये मात्र हवामान कोरंड आहे. त्यात फारसा बदल पुढच्या चार पाच दिवसांमध्ये होण्याची शक्यता कमी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह, वादळी वाऱ्यात पावसाची उपस्थिती पाहायला मिळू शकते.

मिचॉंग चक्रीवादळ अद्यापही प्रभावी

दरम्यान, मिचॉंग चक्रीवादळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश राज्यांमध्ये अद्यापही आपला प्रभाव दाखवत आहे. वादळामध्ये पडलेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नई ठप्प झाली. पावसाशी संबंधित घटनांमुळे शहरात 17 लोकांचा मृत्यू झाल्याची आतापर्यंतची माहिती आहे. नागरिकांचा मृत्यू झाल्याने चेन्नई हे वादळाचे प्रमुख केंद्र बनल्याची स्थिती पाहायला मिळते आहे. ग्रेटर चेन्नई पोलिसांनी सांगितले की, बुडून मृत्यू आणि विजेचा धक्का लागण्याच्या दहा घटनांची नोंद झाली आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये मदत पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच, ती यंत्रणा सक्रीय आहे.

मिचॉंग चक्रीवादळादरम्यान उद्भवू शकणारी संभाव्य स्थिती विचारात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) अतिरिक्त पथकांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच, सखल भागात 300 बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. इतर जिल्ह्यातील सुमारे 5,000 सरकारी कर्मचारी मदत कार्यात सामील होतील, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.