Nashik Water crises

Maharashtra Water Storage : राज्यातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे, राज्यातील धरणांमधील (Dam) जलसाठ्यात (Water Storage) कमतरता निर्माण झाली आहे. धरणसाठ्यात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. चिंताजनकबाब म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत हा जलसाठा प्रचंड कमी आहे. यंदाचा उन्हाळा मराठवाडा आणि विदर्भासाठी आणखी चिंताजनक आहे. कारण,मराठवाड्यात फक्त 21 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरु होण्यासाठी अजून ३ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे एप्रिलनंतर आणि मे महिन्यात राज्यात पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा :Mumbai Water Crisis: मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट, जलाशयात उरला केवळ 15.2 टक्के पाणीसाठा )

राज्यातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 859 गावात आणि 2054 वाड्यांसाठी तब्बल 940 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 65 शासकीय टँकरचा समावेश आहे. तर, 875 खाजगी टँकरचा समावेश आहे. ज्यात सर्वाधिक पाण्याचे टँकरने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरु आहे. संभाजीनगर 200 टँकरने पाणी पुरवठा केली जात आहे. एकूण टँकरची संख्या पाहिल्यास पालघर जिल्ह्यात 13 टँकर, नाशिकमध्ये 189 टँकर, धुळ्यात 4 टँकर, जळगावात 29 टँकर, अहमदनगरमध्ये 49 टँकर, पुण्यात 49 टँकर, साताऱ्यात 116, सांगलीत 72 टँकर, सोलापूरात 21 टँकर, संभाजीनगरमध्ये 200 टँकर, जालन्यात 176 टँकर, बीडमध्ये 2 टँकर, लातूरमध्ये 3 टँकर, बुलढाण्यात 17 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. (हेही वाचा :Mumbai Water Shortage: धरणातील जलसाठा 26 टक्क्यांवर, मुंबईकरांवर पाणीकपातीची लटकती तलवार; बीएमसीने धाडले राज्य सरकारला पत्र )

मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 21 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक आणि पुणे विभागातील धरणक्षेत्रात 40.5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोकणातील धरणांमध्ये 53 टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावतीतील धरणांमध्ये 52 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपुरातील धरणांमध्ये 50 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती आहे. जायकवाडी धरणात जलसाठा 23 टक्क्यांपर्यंत खाली उतरला आहे. मांजरा धरणात फक्त 8.43 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे माजलगाव धरण शून्य टक्क्यांवर आहे. उस्मानाबादेतील अनेक छोटी धरणे आटली आहे. उजनी धरणसाठा देखील शून्य टक्क्यांवर, मागील वर्षी याचवेळी या धरणात 55 टक्के पाणीसाठा होता. कोयना धरणाचा जलसाठा देखील निम्म्यावर असून, 51 टक्के जलसाठा शिल्लक आहे.