Water | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मुंबई (Mumbai) शहरासमोर पाणी टंचाईचे (Mumbai Water Shortage) संभाव्य संकट उभे ठाकले आहेत. मुंबई महापालिकेने राज्य सरकारला केलेल्या मागणीतून ही माहिती पुढे आली आहे. मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 26% इतकाच पाणीसाठी शिल्लख आहे. परिणामी गरज पडल्यास शहराला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे शहरासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन द्यावे. त्यातच यंदा पावसाचे प्रमाणही कमी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या ऐन मध्यात मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असे बोलले जात आहे.

वाचकाच्या माहितीसाठी असे की, पाठिमागील वर्षी एप्रिल महिन्यात मुंबई शहरातील पाणीसाठा 30% इतका होता. त्यामुळे पाठिमागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात 4% घट दिसून येत आहे. केवळ मुंबईच नव्हे तर पुणे शहरालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच एक आढाव बैठक पार पडली. या बैठकीत पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. तुर्तास तरी पुणे शहराला पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात पाणीकपात लागू करण्याची आवश्यकता नसल्याचे मत पडल्याने पुणेकरांच्या डोक्यावर असलेली पाणीकपातीची टांगती तलवार टळली आहे.

मुंबई महापालिकेने या संदर्भात एक पत्र राज्य सरकारला पाठविल्याचे समजते. या पत्रात आवश्यकता पडल्यास मुंबई शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करुन द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पालिकेने पाठवलेले पत्र राज्य सरकारला प्राप्त झाले असून, त्यावर लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुणे काय किंवा मुंबई काय दोन्ही शहरांतील नागरिककरण आणि लोकसंख्यचे प्रमाण प्रचंड वाढू लागले आहे. त्यामुळे सहाजिक शहरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या यंत्रणांवर ताण निर्माण होतो आहे. ताण कमी करायचा असेल तर शहरांवरील भार हलका करावा लागेल किंवा पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करावी लागेल.