Maharashtra Election Results 2019 TV9  Live Streaming: टीव्ही 9 वर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचे अपडेट्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Vidhan Sabha Result | File Image

महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर दिवशी विधानसभा निवडणूक 2019 साठी मतदान पार पडलं. आज (24 ऑक्टोबर) राज्यात मतदान निकाल जाहीर केला जाणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून या मतदानाचे कल आणि कौल हाती येण्यास सुरूवात होणार आहे. हे सारे अपडेट्स तुम्ही डिजिटल, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बघू शकणार आहात. टीव्ही 9, एबीपी माझा, नेटवर्क 18 लोकमत या अग्रगण्य वृत्तवाहिन्यांवर तज्ञांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल दाखवले जाणार आहे. या वाहिन्यांनी मतदानादिवशी एक्झिट पोल देखील जाहीर केले आहेत. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यात पुन्हा शिवसेना- भाजपाची महायुती सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज निकालाकडे शिवसैनिक, भाजप नेते, कार्यकर्ते यांच्यासह सामान्यांचेही लक्ष लागले आहे. मग जर तुम्हांला टीव्ही 9 वर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे निकाल पहायचे असतील तर टेलिव्हिजनप्र्माणेच युट्युब चॅनलवरही पाहता येऊ शकतात. Maharashtra Assembly Elections 2019 Tv9-Cicero Exit Poll Results: राज्यात शिवसेना-भाजप महायुती पुन्हा ठरणार वरचढ, पाहा एक्झिट पोल ची आकडेवारी.

2014 मध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 122 जागा, शिवसेनेस 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या. आता यंदा राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे, आम आदमी पार्टीसह अपक्षांच्या पारड्यात किती जागा येतात? हे पाहणं मोठं उत्सुकतेचं ठरणार आहे.

टीव्ही 9 वरील विधानसभा निवडणूक निकाल 2019 चे अपडेट्स येथे पहा

महराष्ट्रामध्ये 288 विधानसभा जागांवर मतदान पार पडले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 145 चा जादूई आकडा गाठण्यासाठी राजकीय समीकरणं कशी जुळवली जाणार? महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री कोण होणार या सार्‍याचा उलगडा थोड्याच वेळात होणार आहे.