गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आज (21 ऑक्टोबर) अखेर शांत झाली. संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक मतदान झाले नाही असे एकूणच एक्झिट पोलचा (Exit Poll) अंदाज आहे. मतदान झाले की लोकांना उत्सुकता असते ती प्रसारमाध्यमांद्वारे दाखवले जाणारे एक्झिट पोलची. नुकताच Tv9-Cicero संस्थेने आपला एक्झिट पोल जाहीर केला. हा सर्वात विश्वसनीय असा एक्झिट पोल असल्याचा Tv9 कडून सांगण्यात येत आहे. या एक्झिट पोल नुसार, महायुतीला एकूण 52%, महाआघाडीला 33% आणि इतर पक्षांना 15% जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या टक्केवारीनुसार, महायुतीत एकूण 197 जागा, महाआघाडीत एकूण 75 जागा आणि इतर पक्षांना 16 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. टीव्ही9 मराठी काही दिवसांपूर्वी नेता, सी व्होटर आणि जन की बात या तीन संस्थांचा ओपनियन पोल एकाच ठिकाणी, एकाच वेळी प्रसारित केला. हा ओपिनियन पोल सर्वस्वी त्या संस्थांचा होता.
महायुतीत अपेक्षित जागा:
भाजप-123
शिवसेना-74
महाआघाडीतील अपेक्षित जागा:
काँग्रेस-40
राष्ट्रवादी काँग्रेस- 35
इतरः
मनसे-0
वंचित-0
इतर-16
महाराष्ट्रामध्ये सध्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 122 जागा, शिवसेनेस 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या.
राज्यात एकूण 288 विधानसभा जागांसाठी ही मतदान प्रक्रिया झाली. या जागांसाठी हा एक्झिट पोल दाखविण्यात आला. यात प्रत्येक प्रसारमाध्यमांच्या एक्झिट पोल मधील आकडेवारीत थोडा फार बदल असेल मात्र महायुतीचीच पुन्हा सत्ता येणार असे एकूण सर्व एक्झिट पोल मध्ये दाखविण्यात आले. शेवटी अंतिम निकाल हा येत्या 24 ऑक्टोबरला जाहीर होईल आणि कोणत्या पक्षाचे पारडे जड होईल आणि जनमताचा कौल कोणाला मिळेल हे तेव्हाच कळेल. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ चे असेच ताजे अपडेट्स पाहण्यासाठी वाचा लेटेस्टली मराठी