यवतमाळ (Yavatmal) येथे शेततळ्यात बुडून (Drown) दोन शाळेकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बाभूळगाव (Babhulgaon) तालुक्यातील नांदुरा खुर्द (Nandura Khurd) येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. शेतात खत टाकून परतल्यानंतर वाटेत असलेल्या शेततळे पाहून या दोघांना पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या. परंतु, शेततळ्यातील गाळ्यात फसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश राजेंद्र दुधकोर (वय, 15) आणि चेतन सुरेश मसराम (वय, 16) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही सोमवारी दुपारी शेतात खत टाकायला गेले होते. काम आटोपून घरी येत असताना त्यांना पाण्याने भरलेले शेततळ दिसले. त्यावेळी या दोघांनाही पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर दोघांनाही पाण्यात उड्या घेतल्या. पंरतु, शेततळ्यात अधिक गाळ असल्याने हे दोघेही फसले. त्यांच्यासोबत असेलेल्या मुलांनी गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेवून शेततळ्यात बुडालेल्या मुलांना बाहेर काढले. मात्र तो पर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. हे देखील वाचा- Thane: पैशांवरुन माय-लेकांमध्ये वाद; पोटच्या मुलाकडून आईची हत्या, ठाण्यातील घटना
याआधी दोन दिवसांपूर्वी मित्रांसोबत पोहायला गेलेल्या दोन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. ही घटना रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथे घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.