Maharashtra SSC Supplementary Result 2019: आज महाराष्ट्र बोर्ड 10वी पुरवणी परीक्षा निकाल होणार जाहीर,mahresult.nic.in वर असा पहा निकाल
Maharashtra Board 10th Result | (Archived, edited, representative images)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा (10th Supplementary Exam Result) निकाल आज ,म्हणजेच 30 ऑगस्ट 2019  रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या मार्च महिन्यात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी म्हणून ही परीक्षा घेण्यात आली होती. 17 ते 30 जुलै या काळात पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल आज लागणार आहे. संबंधित विद्यार्थी आपला निकाल mahresult.nic.in या शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर पाहू शकतात.

दरम्यान, इयत्ता 12 वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल लागल्यावर दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये देखील बरीच उत्सुकता होती, निकालाच्या तारखांचे अंदाज लावणारे अनेक सोशल मीडिया फॉर्वर्डस देखील मोठ्या पप्रमाणात पसरत होते. मात्र राज्य शिक्षण मंडळाने याबाबत अधिकृत घोषणा करून आज, दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार असल्याचे कळवले आहे.

कसा पहाल तुमचा 10 वी पुरवणी परीक्षा निकाल 2019?

- महाराष्ट्र शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर क्लिक करा.

- Maharashtra SSC Supplementary Result 2019 या लिंकवर जाऊन क्लिक करा.

- निकालाचे लॉग इन पेज ओपन होईल.

- यामध्ये हॉल तिकीट नंबर, जन्मतारीख, आईचे नाव आणि इतर महत्त्वाची माहिती भरुन सबमिट बटणावर क्लिक करा.

- तुमचा Maharashtra SSC Supplementary Result 2019 निकाल पुढील पेजवर दिसेल.

- या निकालाची प्रिंट काढू शकता किंवा ऑनलाईन प्रत सेव्ह करु शकता.

 

(महाराष्ट्र: मल्लखांब, कब्बडी, फुटबॉल सह या 29 खेळांसाठी विद्यार्थ्यांना मिळणार ग्रेस मार्क्स)

2018- 19 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल अत्यंत निराशाजनक लागला होता. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 88.38 टक्के इतका लागला असून लातूर विभागाचा निकाल मात्र 72.87 टक्के इतका लागला होता. तर एकूण निकाल 77.10 %इतका होता.यानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक संधी देऊन त्याचंही शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचवण्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.