देशभरात विविध बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या 10-12 विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासासोबतच त्यांचे कलागुण जोपासता यावेत म्हणून राज्य सरकार विविध स्तरावर प्रयत्न करत आहे. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतानाही कला, क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना काही विशेष मार्क्स किंवा ग्रेस मार्क्स दिले जातात. आता पर्यंत 49 क्रीडा प्रकारांपैकी अवघ्या 29 खेळांना ग्रेस मार्क्स दिले जाणार आहेत. SSC, HSC 2019 Result Date: दहावी, बारावी च्या विद्यार्थ्यांचा निकाल 10 जून पूर्वी maharesults.nic.in या शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर लागणार - MSBSHSE ची माहिती
कोणकोणत्या खेळांना ग्रेस मार्क्ससाठी पात्र धरले जाणार?
लोकमतच्या रिपोर्टनुसार, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, सायकलिंग, फेन्सिंग, फुटबॉल, ज्युडो, टेबल टेनिस, वुशू सेपक टकरा, टेनिक्वाईट, मल्लखांब. सॉप्टबॉल, चेस, स्क्वॅश, आट्यापाट्या, रब्बी, फुटबॉल, खो-खो, बॉल बॅडमिंटन, आर्चरी, अॅमच्युअर कबड्डी, जिम्नॅस्टिक, रायफल, रोलबॉल, बॅडमिंटन, हॅण्डबॉल, टेनिस, हॉकी इत्यादी खेळांना ग्रेस गुणांची सवलत लागू झाली आहे.
सध्या राज्यभरात 49 क्रीडा प्रकारांना मान्यता देण्यासाठी नोंदणीकृत क्रीडा संघटनांकडून क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून प्रस्ताव मागवले होते. मात्र त्यापैकी 29 संघटनांनी पूर्तता करून अहवाल सादर केल्याने आता केवळ याच खेळात नैपुण्य दाखवणार्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्सचा फायदा मिळणार आहे.