Maharashtra: कोविडच्या उपचारासाठी अवघ्या सहा दिवसांच्या बाळाचा एका रुग्णालयातून दुसऱ्या ठिकाणी धावपळ केल्याने अखेर मृत्यू
Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

पालघर (Palghar) येथे अवघ्या सहा दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली. पण तिला त्यावर उपचार मिळण्यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात धावपळ करावी लागण्यासह उपचाराअभावी त्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या बाळाचा 31 मे रोजी जन्म झाला. नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्याला एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात तिला हलविण्यात आले. तेथे गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते.(Sputnik लस जुलै, ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार, वितरकांशी चर्चा यशस्वी झाल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती) 

वैज्ञानिकांकडून सांगितले गेले आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना फटका बसणार आहे. मात्र भारतातील आरोग्य व्यवस्था यांच्यासाठी तितकीशी सक्षम नाही आहे. बाळाचा जन्म 31 मे रोजी सफाळा येथील एका खासगी रुग्णालयात झाला. बाळाची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली होती. बाळाचे वजन सुद्धा कमी असल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात उपचाराठी दाखल करण्यास सांगण्यात आले.(Maharashtra Lockdown: महाराष्ट्रामधील लॉकडाऊनमध्ये सरसकट शिथिलता नाही; स्थानिक प्रशासन घेणार आपापल्या भागातील निर्बंधांबाबत निर्णय)

बाळाच्या आईची आणि त्याची अँन्टीजेन टेस्ट सुद्धा केली गेली. तेव्हा आईची चाचणी निगेटिव्ह आली पण बाळाची चाचणी पॉझिटिव्ह आली. तेव्हा बाळाला पालघर मधील एका ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे आरोग्याच्या सुविधेचा अभाव असल्याने त्याला जव्हार परिसरातील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. तर बाळाची प्रकृती आधीच नाजूक होती आणि अपुरा वैद्यकिय सेवा तेथे सुद्धा होत्या. त्यानंतर बाळाला नाशिक मधील रुग्णालयात दाखल केले गेले.

दरम्यान, बाळावर गेल्या दोन दिवसांपासून नाशिक मधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी अखेर बाळाची कोविड19 शी झुंश अयशस्वी ठरली आणि त्याचा मृत्यू झाला.