Sputnik लस जुलै, ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार, वितरकांशी चर्चा यशस्वी झाल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे," अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Sputnik लस जुलै, ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार, वितरकांशी चर्चा यशस्वी झाल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात मुसंडी मारत आलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेला आटोक्यात आणण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश मिळाले आहे. ही लाट राज्यातून संपूर्ण नाहीशी होऊन राज्यात तिसरी लाट येऊ नये कोरोना लसीकरण मोहिम युद्ध पातळीवर सुरु आहे. दरम्यान "राज्यात सध्या 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करायचं आहे. मात्र सध्या लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्पुतनिक लसीच्या (Sputnik Vaccine) वितरकांशी चर्चा झाली आहे. येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे," अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट मंदावली असली तरी हा व्हायरस पूर्णपणे हद्दपार झालेला नाही. त्यात कोरोना लसीचा तुटवडा भासत असल्याने परिस्थिती आणखीनच बिकट होऊन बसली आहे. याच पार्श्वभूमीवर स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा करण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Unlock: महाराष्ट्र अनलॉक! 5 पैकी कोणत्या टप्प्यात काय सुरु काय बंद? घ्या जाणून

केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून व्हॅक्सीन इंपोर्टचं एक स्पष्ट धोरण ठरवावं. तसेच याला इतर राज्यांना मदत करावी. तसेच ज्यांनी दोन लस घेतल्या असतील तरी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. सध्या तरी तोंडावरचा मास्क हटणार नाही, असेही राजेश टोपे म्हणाले. तसेच दोन्ही लसी घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अँटिबॉडीज तयार होत असतात. त्याशिवाय जर तुम्ही अँटीबॉडीज चेक केल्या असतील आणि शरीरात जर भरपूर अँटीबॉडीज असतील तर त्या व्यक्तीला कुठलाही काही प्रॉब्लेम नसतो. पण शास्त्रीय पद्धतीने लस घेणाऱ्या व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होत नसला तरी मास्क आणि सोशल डिस्टंसिंग राखणे ही महत्त्वाची गरज आहे, असेही राजेश टोपेंनी सांगितले.

(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2021 03:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).