Dead body | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

बेळगाव (Belagavi) मध्ये सहलीला गेलेल्या मुलींचा सेल्फीचा (Selfie)  नादान प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला आहे. 4 मुली बेळगावी मध्ये एका धबधब्या खाली सेल्फीसाठी उभ्या होत्या. त्यावेळी घसरून त्यांचा अपघात झाला. बेळगावी तालुक्याच्या जवळ Kitwad Falls मध्ये हा अपघात झाला आहे. या मुली एका 40 जणींच्या ग्रुपचा भाग होत्या. कामत गल्लीच्या मदरसा मधून 40 मुली ट्रीप साठी आल्या होत्या.

दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या मुलींची ओळख पटली आहे. 17-20 वर्षांच्या या मुली Asia Mujawar, Kudshia Hasim Patel, Ruksar Bhisti आणि Tasmia होत्या. बेळगाव मध्येच त्या राहणार्‍या होत्या.

TOI च्या रिपोर्ट्सनुसार, शनिवार 26 नोव्हेंबरच्या सकाळी 40 मुलींचा ग्रुप सहलीसाठी Kitwad Falls ला निघाला होता. त्यानंतर ग्रुप सेल्फी काढताना हा प्रकार घडला. 5 जणींचा तोल गेला आणि त्या पाण्यात पडल्या. पाण्याजवळ उभ्या राहणार्‍या कुणालाच स्विमिंग कसे करावं हे ठाऊक नव्हतं. त्या मुलींना कुणीही वाचवू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये 1 मुलगी वाचली आहे तिला खाजगी रूग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे. सध्या तिच्या जीवावरचा धोका टळला आहे. अन्य चार मुली मात्र मृत्यूमुखी पडल्या आहेत. नक्की वाचा: Two Drown in Maval: सेल्फी काढताना 8 वर्षीय मुलगा पडला पाण्यात, वाचवण्यासाठी गेलेल्या वडील आणि मामांचा बुडून मृत्यू .

मुलींचे पालक आणि नातेवाईकांनी हॉस्पिटल जवळ गर्दी केली होती. सध्या  Chandgad police station मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.