महाराष्ट्रात (Maharashtra) आज 181 जणांचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाला असून 5257 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज मृत्यू झालेल्या 181 रुग्णांमध्ये 78 मृत्यू हे गेल्या 48 तासांमधील आहेत. तर 103 मृत्यू हे मागील कालखंडातील आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 169883 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात 73298 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाच्या (State Health Department) हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
राज्यात 2385 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत देण्यात आलेल्या सवलती, नियमांमधील शिथीलता कायम राहणार आहेत. आज मुंबईतील धारावीत 17 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा -COVID19 Cases In Dharavi: मुंबई येथील धारावी परिसरात एकूण 2 हजार 262 कोरोनाबाधित; दिवसभरात 17 नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू))
Maharashtra reports 181 deaths and 5257 new #COVID19 positive cases today. Out of 181 deaths, 78 occurred in the last 48 hours and 103 from the previous period. The total number of cases in the state reaches 169883 including 73298 active cases: State Health Department pic.twitter.com/M4EtqjLKOg
— ANI (@ANI) June 29, 2020
दरम्यान, भारतात कोरोना संक्रमितांचा आकडा 5,48,318 इतका झाला आहे. गेल्या 24 तासात देशात 19,459 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. सध्या देशात उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 2,10,120 इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत 3,21,723 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. परंतु, आतापर्यंत देशात 16,475 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.