महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पुरेपूर हजेरी लावली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. प्रामुख्याने कोल्हापूर (Heavy Rains in Kolhapur) , सातारा (Rains in Kolhapur Satara), पुणे (Heavy Rains in Pune) आणि रत्नागिरी (Heavy Rains in Ratnagiri) अशा जिल्ह्यांमध्ये ही स्थिती अधिक मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याचे पाहायला मिळते आहे. कोल्हापूरध्ये पंचगंगार नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात कृष्णा, रत्नागिरी जिल्ह्यात वशिष्ट नदीच्या पाण्याने धोकादायक पातळी गाठली आहे. पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याची माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने चांगलाच कहर करण्यास सुरुवात केली आहे. मुसळधार पावसाने काजळी, वशिष्ट यांसारख्या नद्या दुथढी भरुन वाहात आहेत. नागरिकांना सतर्क करण्यासाठी आणि सतर्क धोका सांगण्यासाठी राजापूर नगरपरिषदेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केले आहे. चीपळून तर पाण्याखाली गेले आहे. चिपळून शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक सांगतात. (हेही वाचा, Mumbai Rains Updates: मुंबईत अनेक ठिकाणी पाणीच पाणी, रस्त्यांवर वाहतूक कोंडी, सीएसएमटी ते टिटवाळा रेल्वे वाहतूक सुरु)
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात पाठिमागील दोन दिवसांपासून मुसळदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे धरण आणि नदीच्या पाणी पातळीत कामलीची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीला पूर आला आहे. ही स्थिती कायम राहिली तर पंचगंगा लवकरच पूरस्थिती धारण करु शकेल अशी चिन्हे आहेत. संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफची दोन पथके कोल्हापूर येथे दाखल होत आहेत. ही पथके पुण्याहून निघाली असून, आज दुपारपर्यंत कोल्हापूरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे.
पुणे
पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस (Heavy Rain in Pune District) बरसत आहे. अतिवृष्टीमुळे पुणे, मावळ, लोणावळा, खंडाळा आदी परीसर मोठ्या प्रमाणावर पाऊस अनुभवतो आहे. लोणावळा-खंडाळा आदी ठिकाणी तर ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अवघ्या तीन तासात लोणावळा खंडाळा व परिसरात तब्बल 175 मिमी इतक्या पाऊस झाला असावा असा अंदाज व्यक्त होतो आहे. मावळ, (Maval) लोणावळा (Lonavala) व खंडाळा (Khandala) शहर व ग्रामीण भागांत ओढे, नदी, नाले तुडूंब भरुन वाहात आहेत. सकल भागांमध्ये असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी घुसले.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातही कृष्णा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे नदीपात्रात असलेली स्मशानभूमीही पाण्याखाली गेली आहे. या स्मशानभुमीत कोरोना संक्रमित मृतांवर अंत्यसंस्कार केले जात असत. सध्या ही स्मशानभूमीच पाण्याखाली गेल्यामुळे हे अंत्यसंस्कार कसे करायचे याबाबत मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. स्मशानभूमीतील लाकडेही पाण्यात वाहून गेले आहेत.