राज्यभर विश्रांती घेतलेला पाऊस आजपासून पुन्हा बरसणार आहे. राज्यात पुढील 4-5 दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा IMD ने दिेला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 19 सप्टेंबर रोजी कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. 20 सप्टेंबर रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रात ढगांचा गडगडात आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भाताही पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra Rain Forecast: उद्यापासून पुढील 3 दिवस राज्याला मुसळधार पावसाचा इशारा)
K S Hosalikar Tweet:
राज्यात पुढचे 4,5 दिवस पावसाची शक्यता आज IMD ने वर्तवली:
🔸उत्तर-पश्र्चिम मध्यप्रदेश,पुर्व राजस्थान स्थित कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासात क्षीण
🔸बंगालच्या उपसागरावरची सिस्टिम पुढच्या 12 तासात ओरीसाकडे सरकेल व पुढच्या 2,3 दिवसात
पश्र्चिम-उत्तर:पश्र्चिम दिशेने सरकण्याची शक्यता. https://t.co/QwGhRHaIDp
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 18, 2021
21 सप्टेंबर रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 22 सप्टेंबर रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.