Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 08, 2025
ताज्या बातम्या
2 minutes ago
Live

Maharashtra Monsoon Live Updates: येत्या 48 तासांत मुंबई, ठाणेसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्र Poonam Poyrekar | Jun 26, 2019 02:04 PM IST
A+
A-
26 Jun, 14:04 (IST)

येत्या 48 तासांत मुंबई, ठाणेसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आज सकाळपासून अंधेरा भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

26 Jun, 12:27 (IST)

 गोव्यात आज सकाळपासून पाऊस पावसाने दमदार हजेरी लावली असून येथील वातावरणात थंडावा. निर्माण झाला आहे. तर पणजीमध्ये सखल भागामध्ये पाणी साचल आहे.  

26 Jun, 10:37 (IST)

पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत तुरळक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

26 Jun, 10:11 (IST)

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, अखेर शेतक-यांची पेरणीला सुरुवात झाली आहे. या जोरदार पावसाची गेल्या अनेक दिवसापासून बळीराजा वाट पाहात होता.

26 Jun, 09:31 (IST)

आज पहाटे पासून जोगेश्वरी आणि सांताक्रूझ भागात ही पावसाच्या हलक्या सरींनी सुरुवात झालेली आहे.

26 Jun, 08:45 (IST)

अंधेरीच्या ब-याच भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून काही भागात पाणी देखील साचल्याचे चित्र पाहायला मिळाले

Monsoon Live Update: मुंबईत म्हणावी तशी पावसाला सुरु झाली नसली तरीही महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. ही सुरुवात अपेक्षेप्रमाणे नसली तरीही पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागात पावसाला सुरुवात झाली असून अन्य भागात केवळ ढगांचा गडगडाट आणि तुरळक पाऊस पडत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाचा पावसाचे 13 दिवस उशिराने आगमन झाल्याने नागरिक तसेच मुख्यत: शेतकरी वर्ग प्रचंड चिंतेत आहे.

प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज काय?

1. मुंबई, ठाणे, पालघर येथे 27आणि 28 जून रोजी एक-दोन ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील.

2. रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे एक-दोन ठिकाणी 28 जूनपर्यंत जोरदार सरींची शक्याता.

3. धुळे, नंदूरबार, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथे मंगळवारी एक-दोन ठिकाणी जोरदार पाऊसाची शक्यता.

4. पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये 25 ते 28 जून या कालावधीत काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता.

हेही वाचा- Maharashtra Monsoon Update: मुंबई शहरासह उर्वरीत महाराष्ट्रात वरुनराजा बरसला; पाहा कोणकोणत्या ठिकाणी पडला पाऊस

आजवरचा इतिहास पाहता अपवाद वगळता मान्सून नेहमी कोकण, मुंबईत पहिल्यांदा दाखल होतो. यंदा मात्र, मुंबईच्याही आदी मान्सून उर्वरीत महाराष्ट्रात पोहोचला. यंदा हा अपवाद पाहायला मिळाला. अरबी समुद्रातील मान्सून शाखेच्या तुलनेत बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा अधिक सक्रीय असल्याने असे घडल्याचे हवामान अभ्यासक सांगतात. दरम्यान, मान्सून मराठवाड्यात पोहोचला आहे. मान्सूनच्या काही सरीही मराठवाड्यात कोसळल्या. मात्र, दमदार मान्सून पावसाची अद्यापही प्रतिक्षाच आहे. ताज्या अपडेट्स साठी पाहत राहा लेटेस्टली मराठी


Show Full Article Share Now