Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 08, 2025
ताज्या बातम्या
6 minutes ago

Viral Video: बॉब-कट हेअरस्टाईलमध्ये हत्तीने केले अनेकांना घायाळ, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

Videos Shreya Varke | Feb 08, 2025 10:43 AM IST
A+
A-

Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल  झाल्याचे पाहायला मिळते. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही व्हिडिओ इतके खास असतात की ते वारंवार पाहण्याची इच्छा होते. तुम्ही सर्वांनी आजपर्यंत हत्तीचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. दरम्यान, एका मॉडेल हत्तीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.  तामिळनाडूतील एक हत्ती सध्या त्याच्या  हेअरस्टाईलमुळे इंटरनेट चर्चेत आहे. मन्नारगुडी येथील राजगोपालस्वामी मंदिरात राहणारा सेंगमालम येथील हा हत्ती  त्याच्या बॉब कट हेअरस्टाईलमुळे ओळखले जातात आणि त्याला बॉब-कट सेंगमलम म्हणून संबोधले जाते.  एक्स अकाऊंटवरून @Rainmaker1973 या आयडी वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हत्ती हा जंगलातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो यात शंका नाही, म्हणूनच हत्ती आणि मानव यांच्यात अनेकदा विशेष नाते दिसून येते. साधारणपणे आपण पाहिलेल्या हत्तींच्या डोक्यावर केस नसतात, पण आजकाल हा खास हत्ती त्याच्या अनोख्या हेअरस्टाईलमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हेही वाचा: World's Most Expensive Cow: ब्राझीलमध्ये तब्बल 42 कोटीला विकली गेली Viatina-19 गाय; ठरली जगातील सर्वात महागडी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये

येथे पाहा, हत्तीचा व्हिडीओ

व्हिडीओ पोस्ट करून  कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, आपल्या अनोख्या हेअरस्टाईलमुळे तामिळनाडूतील एका हत्तीचे अनेक चाहते झाल्याचे दिसून येत आहे. सेंगमलाई मन्नारगुडी येथील राजगोपालस्वामी मंदिरात हा हत्ती रहात असून बॉब-कटमुळे तो देशभरात चाहत्यांचा आवडता बनला आहे. शेअर केल्यापासून या व्हिडिओला आतापर्यंत 305 हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

सेंगमालमच्या मंदिराने  काही वर्षांपूर्वी एका वृत्तपत्राला सांगितले होते की, हा हत्ती मुलासारखा आहे आणि त्यांना त्याचा खास लूक द्यायचा आहे. इंटरनेटवर बॉब कट असलेल्या हत्तीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी त्याच्या हत्तीच्या केसांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. सेनगामलममधील हत्तीचे केस उन्हाळ्यात दररोज तीन वेळा धुतले जातात, तर इतर ऋतूंमध्ये एकदा धुतले जातात.

RELATED VIDEOS