BJP and AIADMK form alliance (फोटो सौजन्य - ANI)

Tamil Nadu Assembly Election 2026: भारतीय जनता पक्ष आणि अण्णाद्रमुक आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुका (amil Nadu Assembly Elections 2025) एकत्र लढणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शुक्रवारी याबाबत घोषणा केली. यासंदर्भात घोषणा करताना अमित शहा यांनी तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार (NDA Government) स्थापन होईल, असा दावा केला. तसेच एनडीए पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवेल, असंही अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केलं.

तामिळनाडू निवडणुकीसाठी भाजप-एआयएडीएमके युतीबद्दल बोलताना अमित शाह म्हणाले, आगामी तामिळनाडू निवडणुकीत जनता द्रमुकच्या भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न, दलित आणि महिलांवरील अत्याचारांविरोधात मतदान करेल. द्रमुक सरकारने 39000 कोटी रुपयांचा दारू घोटाळा, वाळू खाण घोटाळा, ऊर्जा घोटाळा, एलसीओटी घोटाळा, वाहतूक घोटाळा, मनी लाँड्रिंग घोटाळा केला. असे अनेक घोटाळे आहेत ज्यांची उत्तरे द्रमुकने तामिळनाडूच्या जनतेला द्यावीत, असंही अमित शहा यावेळी म्हणाले.

अमित शाह यांनी सीमांकन आणि नीटच्या मुद्द्यांवरही चर्चा केली आणि सांगितले की द्रमुक आणि विरोधी पक्ष लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सीमांकन आणि नीटचे मुद्दे उपस्थित करत आहेत. आम्ही द्रमुकसोबत बसू आणि या मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा करू. तथापी, अमित शहा यांनी चेन्नई येथे भाजपचे के. अन्नामलाई आणि अण्णाद्रमुकचे एडाप्पाडी पलानीस्वामी यांच्यासोबत पत्रकार परिषदेत बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला. तामिळनाडूमध्ये एनडीए पुन्हा एकदा प्रचंड बहुमत मिळवेल आणि राज्यात सरकार स्थापन करेल.

पहा व्हिडिओ - 

तामिळनाडूमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होणार -

दरम्यान, यावेळी अमित शहा म्हणाले की, मला विश्वास आहे की येत्या निवडणुकीत एनडीए पुन्हा एकदा प्रचंड बहुमत मिळवेल आणि एनडीएचे सरकार पुन्हा एकदा तामिळनाडूमध्ये स्थापन होईल. मागील दोन निवडणुकांमध्ये लोकसभा आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकला चांगली कामगिरी करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.