![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/jaya-ekadashi-1.avif?width=380&height=214)
Jaya Ekadashi 2025 HD Images: दरवर्षी 24 एकादशींचे व्रत भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित केले जातात. या व्रतांमध्ये माघ शुक्लातील जया एकादशीचे (Jaya Ekadashi 2025) विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केल्याने केवळ नकारात्मक शक्तींपासून मुक्तता मिळते. तसेच जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्तीची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. यासोबतच साधकाला मोक्षप्राप्तीचे आशीर्वाद देखील मिळतात. पंचांगानुसार, जया एकादशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला साजरी केली जाते.
आज सर्वत्र जया एकादशीचे व्रत पाळण्यात येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी तुम्ही विष्णू भक्तांना सोशल मीडियावर WhatsApp Status, Messages द्वारा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील प्रतिमा मोफत डाऊनलोड करू सकता.
जया एकादशीच्या शुभेच्छा -
![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/happy-jaya-ekadashi.avif?width=1000&height=565)
![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/jaya-ekadashi-3.avif?width=1000&height=565)
![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/jaya-ekadashi-2.avif?width=1000&height=565)
![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/jaya-ekadashi.avif?width=1000&height=565)
![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/jaya-ekadashi-2024-2-380x214.avif?width=1000&height=565)
जया एकादशीचे व्रत केल्याने भक्ताला केवळ आध्यात्मिक आणि भौतिक समृद्धी मिळत नाही तर भगवान विष्णूच्या कृपेने तो जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्त होतो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.