दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. सध्या ईव्हीएमची मोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, एकूण 70 जागांवरील आघाडी समोर आली आहे. यामध्ये  भाजप 50 जागांवर आघाडीवर आहे आणि आम आदमी पार्टी 19 जागांवर आघाडीवर आहे. यासह काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे. याचा अर्थ ट्रेंडमध्ये भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, कालकाजी मतदारसंघातून आतिशी, जंगपुरा मतदारसंघातून मनीष सिसोदिया आणि पटपरगंज मतदारसंघातून अवध ओझा पिछाडीवर आहेत. 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील 70 जागांसाठी 60.54% मतदान झाले. सुरुवातीच्या एक्झिट पोलनुसार यंदा दिल्लीत भाजप सत्ता स्थापन करेल असा अंदाज वर्तवला होता. दुपारी 12 वाजेपर्यंत दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. आम आदमी पक्ष दिल्लीत दोन वेळा सत्तेत आहे. जर यावेळी ते जिंकले तर दिल्लीत केजरीवाल यांची हॅट्रिक असेल. दुसरीकडे, जर भाजप जिंकला तर 27 वर्षांनी देशाच्या राजधानीत भगवा झेंडा फडकेल. दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 विधानसभा जागांसाठी एकूण 699 उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे, ज्यामध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात स्पर्धा आहे.

Delhi Assembly Election Result 2025:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)