Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 08, 2025
ताज्या बातम्या
2 minutes ago

Bishnoi Gang Members Get Bail in Salman Khan Case: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींचा जामीन उच्च न्यायालयाने केला मंजूर

Videos Shreya Varke | Feb 08, 2025 12:37 PM IST
A+
A-

Bishnoi Gang Members Get Bail in Salman Khan Case:  लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या अनेक दिवसापासून मिळत आहेत. अभिनेता सलमान खानला धमकीच्या ईमेलच्या स्वरूपात पहिली धमकी आली होती. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या हत्येच्या कटाशी संबंधित प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. या कटात अटक करण्यात आलेल्या बिश्नोई टोळीतील गौरव भाटिया उर्फ संदीप बिश्नोई आणि वास्पी महमूद खान या दोघांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बोरकर यांनी दोघांचा जामीन अर्ज मंजूर केला असला तरी अद्याप सविस्तर आदेश काढण्यात आलेला नाही. गौरव भाटिया आणि वास्पी महमूद खान यांनी सलमान खानचे पनवेल फार्महाऊस, वांद्रे येथील त्याचे घर आणि त्याच्या शूटिंग लोकेशन्सची तपासणी केल्याचा धक्कादायक खुलासा नवी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी केला होता. यानंतर पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील १८ जणांविरोधात खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला. गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसवर छापा टाकून 'सिकंदर' अभिनेत्याच्या हत्येचा कट रचणाऱ्या दोन आरोपींना अटक केली होती. हे दोन्ही आरोपी लॉरेन्स बिश्नोई यांच्या टोळीशी संबंधित असल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी या दोन्ही आरोपींबाबत निकाल दिला आहे.

 
येथे पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

गेल्या वर्षी नवी मुंबई पोलिसांनी दावा केला होता की, या आरोपींनी इतर आरोपींसह मुंबईजवळील पनवेल मधील सलमान खानच्या फार्महाऊसची रेकी केली होती. या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील १८ जणांविरुद्ध सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वांद्रे येथे केला होता गोळीबार

बिश्नोई टोळीतील दोन गुंडांनी वांद्रे येथील सलमान खानच्या अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला होता. या हल्ल्यानंतर मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने कारवाई केली आणि या कटाचा पर्दाफाश झाला होता. बिश्नोई टोळीतील दोन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सलमान खानविरोधात बिश्नोई टोळीचा कट अजूनही सुरू आहे का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

RELATED VIDEOS