Accident (फोटो सौजन्य - ANI)

Navi Mumbai Accident: नवी मुंबई (Navi Mumbai) मधून अपघातासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. सोमवारी रात्री जासई नाका येथे झालेल्या अपघातात (Accident) एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. उरण पोलिसांनी (Uran Police) ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे आहे. मृताचे नाव मोहम्मद इर्शाद यामीन मन्सुरी (37) असे आहे. अपघातात मृत्यू झालेला तरुण उरणमधील रांजणपाडा येथील रहिवासी होता.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास मन्सुरी त्याच्या मोटारसायकलवरून घरी जात असताना जासई नाकासमोर मागून वेगाने येणाऱ्या ट्रेलरने त्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात इर्शाद गंभीर जखमी झाला. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. उरण पोलिसांनी अपघातासाठी जबाबदार असलेल्या ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा - Pune Mercedes Accident: पुणे मर्सिडीज अपघात; वडगाव पुलावर भरधाव कारची दुचाकीस धडक; एक ठार, अनेक जखमी)

कामावरून घरी परतताना काळाचा घाला -

दरम्यान, मृत व्यक्ती उरणमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होता. अपघात झाला तेव्हा तो कामावरून घरी परतत होता. प्रथमदर्शनी ट्रेलर चालकाच्या निष्काळजीपणाचे कारण समोर येत आहे. तथापि, मृत इर्शादने हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिणामी त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी माहिती दिली आहे. (हेही वाचा, Delhi Hit and Run Case: दिल्ली मध्ये मर्सिडीज कारच्या धडकेत 34 वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू)

मुंबई बेंगळुरू महामार्गावर वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू -

पुण्यात 24 तासांच्या कालावधीत, मुंबई-बेंगळुरू बायपास आणि वडगाव उड्डाणपूल परिसरात तीन जीवघेणे अपघात घडले. वेगवान वाहने आणि दुचाकींमुळे झालेल्या या घटनांमध्ये कॉलेज सुरक्षा रक्षक आणि एका तरुण आयटी कर्मचाऱ्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. पहिला अपघात शनिवारी पहाटे झाला. त्याच दिवशी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास, कात्रजहून नवले पुलाकडे जाताना एका वेगवान ट्रकने नियंत्रण गमावले. ट्रकने दोन दुचाकी, एक ऑटोरिक्षा आणि एक कार अशा अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात सिंहगड कॉलेजमधील सुरक्षा रक्षक राहुल जगन्नाथ खटपे (32) यांचा मृत्यू झाला.