
Bike-Car Collision: पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वडगाव पुलावर (Wadgaon Bridge Crash) मर्सिडीज कार (Mercedes Car Accident आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी पहाटे 4.30 च्या सुमारास वडगाव पुलावरील विशाल हॉटेलजवळ घडली. भरधाव वेगाने आलेल्या मर्सिडीज कारने दुचाकीला धडक दिली आणि हा अपघात घडला. या प्रकरणात मर्सिडीज चालकावर भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita) अन्वये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची, माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. कुणाल हुशार (Kunal Hushar) असे मृताचे नाव आहे. तो चिंचवड येथील रहिवासी आहे. अपघात घडला तेव्हा कुणाल दुचाकी हाकत होता.
दुचाकीस्वाराचा चालकादरम्यान मृत्यू
पोलिस उपायुक्त (डीसीपी) संभाजी कदम यांनी सांगितले की, दुचाकीला धडक दिल्यानंतर मर्सिडीज कार रस्त्याच्या कडेला असलेले बॅरिकेड तोडून वडगाव पुलावरून खाली असलेल्या सर्व्हिस रोडवर कोसळली. कारचे एअरबॅग्ज तत्काळ उघडले, त्यामुळे चालक आणि प्रवाशांना दुखापत झाली नाही. मात्र, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. कुणाल हुशार आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी कुणाल यास उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. त्याच्या मागे बसलेल्यावर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा, Delhi Hit and Run Case: दिल्ली मध्ये मर्सिडीज कारच्या धडकेत 34 वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू)
चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा
पोलिसांनी मर्सिडीज चालकावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 105 (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या वेळी चालक दारूच्या नशेत होता की नाही हे निश्चित करण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. (हेही वाचा, Oshiwara Road Accident: मुंबईत मर्सिडीज कारच्या धडकेत 19वर्षीय फूड डिलेवरी बॉयचा मृत्यू; चालक अटकेत)
कारच्या धडकेमुळे दुचाकीस्वार ठार
Maharashtra | One died and three injured after a Mercedes-Benz car collided with a two-wheeler on the Bengaluru–Pune Highway. Following the collision, the car broke through the barricade on Wadgaon Bridge and fell onto the service road below. The driver and other occupants of the…
— ANI (@ANI) May 3, 2025
>
अपघात घडल्यास तातडीने काय कराल?
रस्ता अपघात झाल्यास, शांत राहा आणि इतरांना मदत करण्यापूर्वी स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित करा. तात्काळ आपत्कालीन सेवांना कॉल करा आणि अपघाताची अचूक माहिती द्या. जर जखमी व्यक्ती बेशुद्ध असेल, तर श्वासोच्छवास आणि नाडी तपासा. आवश्यकता असेल तर सीपीआर सुरू करा. जर त्यांना रक्तस्त्राव होत असेल, तर रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी स्वच्छ कापडाचा वापर करून दाब द्या. जखमी व्यक्तीला तात्काळ धोका असल्याशिवाय हलवू नका, कारण त्यांना पाठीच्या कण्याला दुखापत होऊ शकते. जर त्यांना उलट्या होत असतील किंवा तोंडातून रक्तस्त्राव होत असेल, तर गुदमरण्यापासून रोखण्यासाठी त्यांना त्यांच्या बाजूला करा. धक्का टाळण्यासाठी त्यांना सुरक्षीत ठेवा आणि वैद्यकीय मदत येईपर्यंत त्यांना धीर द्या. अन्न, पाणी किंवा औषधे देणे टाळा. शक्य असल्यास, आपत्कालीन मदत करणाऱ्यांना मदत करण्यासाठी अपघाताचे तपशील लक्षात ठेवा.