The Diplomat Teaser Out

The Diplomat Teaser Out: अभिनेता जॉन अब्राहम याचा आगामी 'द डिप्लोमॅट' चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. टीझरमध्ये जॉन अब्राहमचा दमदार लूक आणि अॅक्शन सीन्स दाखवण्यात आले असून दमदार स्टाईलने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बॉलिवूड अॅक्शन स्टार जॉन अब्राहम पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. द डिप्लोमॅट हा चित्रपट 7 मार्च 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट  शिवम नायर यांनी दिग्दर्शित केला असून यात  हाय-ऑक्टेन थ्रिलर पाहायला मिळणार आहे, ज्यात जॉन अब्राहमची व्यक्तिरेखा अत्यंत तीव्र आणि शक्तिशाली दिसत आहे. भूषण कुमार, जेए एंटरटेनमेंट, वाकाऊ फिल्म्स आणि फॉर्च्युन पिक्चर्स या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अभिनेता जॉन अब्राहमच्या चाहत्यांना चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यापासून चित्रपट कधी रिलीज होणार याची उत्सुकता लागली आहे. द डिप्लोमॅट हा चित्रपट प्रेक्षकांना हायव्होल्टेज ड्रामा आणि एक्साइटमेंट देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हेही वाचा: Arrest Warrant Issued for Sonu Sood: पंजाब कोर्टाने 10 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सोनू सूदविरुद्ध जारी केले अटक वॉरंट, अभिनेत्याच्या अडचणीत वाढ

येथे पाहा, द डिप्लोमॅटचा टीझर

चित्रपटाशी संबंधित आणखी माहिती येत्या काही दिवसांत समोर येईल, पण सध्या तरी हा टीझर जॉन अब्राहमच्या चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही.'द डिप्लोमॅट'मध्ये राजकारण, देशभक्ती आणि गुप्तचर मोहिमा यांचा जबरदस्त मिलाफ पाहायला मिळणार असून, हा एक भन्नाट पॉलिटिकल-अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे.