![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/07/144-1-380x214.jpg?width=380&height=214)
Santorini Island Earthquake: ग्रीसच्या सॅंटोरिनी बेटावर सुमारे एक आठवड्यापासून भूकंपांची मालिका सुरूच आहे. रिसॉर्ट बेटावर येत असलेल्या भूकंपानंतर ग्रीसच्या सरकारने गुरुवारी सँटोरिनीमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. बुधवारी रात्री बेटावर ५.२ रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपानंतर नागरी संरक्षण मंत्रालयाने आणीबाणी जाहीर केली आहे, ज्यामुळे अधिकाऱ्यांना तेथे तातडीने आवश्यक कारवाई करण्यास मदत होईल. सॅंटोरिनी बेटावर ३१ जानेवारीपासून भूकंपाचे धक्के जाणवले असले तरी बुधवारी झालेला भूकंप सर्वात तीव्र होता. हा भूकंप 5.2 तीव्रतेचा होता. 31 जानेवारी पासून सुरु असलेल्या भूकंपाच्या मालिकेत हा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. सरकारचे प्रवक्ते पावलोस मरीनाकिस यांनी सांगितले की, बेटावर आपत्कालीन सेवा देण्यात येत आहेत. हेही वाचा: SEPTA Train Catching Fire: अमेरिकेतील डेलावेअर काउंटीमध्ये सेप्टा ट्रेनला आग; 350 प्रवाशांना सुखरुप वाचवण्यात यश (Watch Video)
अग्निशमन विभाग, पोलीस, तटरक्षक दल, सशस्त्र दल आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे जवान सॅंटोरिनी आणि आजूबाजूच्या बेटांवर तैनात आहेत. भूकंपामुळे कोणतीही मोठी हानी झाली नसली तरी हजारो रहिवासी आणि कामगार भीतीपोटी दुसरीकडे स्थलांतर करत आहेत . बहुतेक लोक बोटींवर बसून ग्रीकच्या मुख्य शहरांच्या दिशेने जात आहेत.
तज्ञ म्हणतात की, हे भूकंप एजियन समुद्रातील ज्वालामुखीच्या क्रियाकलापांशी संबंधित नाहीत, परंतु या क्षेत्राला अधिक शक्तिशाली भूकंप येऊ शकतो की नाही हे ते सांगू शकत नाहीत. बेटाच्या ऑर्थोडॉक्स चर्चने रहिवाशांना अडचणीच्या वेळी एकमेकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.