Maharashtra MLC Election Result 2021: महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक निकाल, महाविकासआघाडी की भाजप? कोण मारणार बाजी? आज फैसला
Maharashtra Legislature | (File Photo)

Maharashtra MLC Election Result 2021: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एकू सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल (Maharashtra Vidhan Parishad Election Result) आज (14 डिसेंबर) जाहीर होत आहे. अर्थात सहापैकी चार जागा आगोदरच बिनविरोध निवडून गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा निकाल आगोदरच लागला आहे. मात्र, निवडणूक बिनविरोध पार न पडलेल्या नागपूर (Nagpur) आणि अकोला वाशिम बुलडाणा (Akola Washim Buldana ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडणार आहे.

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार गोपिकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) आणि भाजपचे वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांच्यात सामना रंगला. तर, नागपूर येथून भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आणि अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांच्यात सामना रंगला. मजेशीर असे की भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या छोटू भोयर यांना काँग्रेसने तातडीने उमेदवारी जाहीर केली खरी. मात्र, लागलीच उमेदवार बदलण्याची नामुष्कीही काँग्रेसवर आली. काँग्रेसने या ठिकाणी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना पाठिंबा दिला. (हेही वाचा, Maharashtra MLC By-election: प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, भाजपची उमेदवारी मागे)

रिंगणात असलेले उमेदवार

नागपूर-

भाजप- चंद्रशेखर बावनकुळे

अपक्ष- मंगेश देशमुख (ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार बदलून पाठिंबा)

अकोला वाशिम बुलडाणा

शिवसेना- गोपिकिशन बाजोरिया

भाजप- वसंत खंडेलवाल

नागपूर मतदारसंघातून महाविकासआघाडी आणि भाजप अशा दोन्ही बाजूंच्या उमेदवाराकडे स्पष्ट बहुमत नव्हते. त्यामुळे दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर असणार हे नक्की. दुसऱ्या बाजूला अकोला,वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातही दोन्ही बाजूला तुल्यबळ लढत होती. मात्र, काँग्रेसने ऐन वेळी आपला उमेदवार बदलला. त्यामुळे या ठिकाणी मतदार कोणाच्या पारड्यात वज टाकतो याबाबत उत्सुकता आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल अशी आशा आहे.