विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC Election 2022) झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (20 जून) पार पडणार आहे.आज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान पार पडेल. त्यानंतर मतमोजणी होणार आहे. सामना आणि निकाल आजच जाहीर होणार आहे. परिणामी राजकीय वर्तुळाती उत्सुकता प्रचंड वाढली आहे. राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ झालेल्या या निवडणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. राज्यसभा निवडणुकीतही घासून झालेला सामना पाहता विधानपरिषद निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस (Congress) विरुद्ध भाजप (BJP) पर्यायाने महाविकासआघाडी (MVA ) विरुद्ध भाजपा असा रंगलेला सामना विधिमंडळातील संख्याबळाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
विधानपरिषदेसाठी एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने रंगत वाढली आहे. एकेका मताला महत्त्व आले असून, पराभूत होणारा 11 वा उमेदवार कोण? याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. महाविकासआघाडीसमोर आपले सर्वच्या सर्व सहा उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य आहे. तर भाजपसमोरही आपले सर्व उमेदवार निडून आणण्याचे आव्हान कायम आहे. जागा दहाच असल्याने कोणत्या तरी एका उमेदवाराचा पराभव निश्चित असला तरी तो सत्ताधारी पक्षाचा की विरोधी पक्षाच्या गटातला याबाबत उत्सुकता आहे. निकाल काहीही लागला तरी त्याचा अर्थ राज्याच्या आणि खासकरुन विधिमंडळातील राज्य सरकारच्या कामगिरीवर अधिक परिणामकारक ठकरे. (हेही वाचा, Vidhan Parishad Election 2022: विधानपरिषदेची निवडणूक कोण जिंकणार? भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार लढत)
महाविकासआघाडीचे सर्वच्या सर्व म्हणजेच सहा उमेदवार निवडून आले तर त्याचा सरळ अर्थ असणार आहे की, सरकार स्थिर आहे. सरकार केवळ स्थिरच नव्हे तर त्यांना सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे विरोधात असलेल्या भाजपला वस्तुस्थितीतूनच प्रत्युत्तर मिळणार आहे. शिवाय, विरोधी पक्ष म्हणून भाजप जेवढा दाखवतो तेवढा सरकारला विरोध नाही. तसेच, सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असाही सरळ मेसेज जनतेत जाणार आहे. समजा याच्या उलट घडले. तर मात्र त्याचे अर्थ राज्याच्या सत्ताधाऱ्यांना विपरीत अवस्थेत ढकलतील. भाजपचा विजय झाला तर हे सरकार अस्थिर आहे. सरकारमधीलच आमदारांचा त्यांच्यावर सरकारवर भरवसा राहिला नाही, असा अर्थ काढला जाईल. त्यामुळे आजचि निवडणूक सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.