Maharashtra Legislature | (Archived images)

महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी येत्या 29 नोव्हेंबरला पोटनिवडणूक (Maharashtra MLC By-Election 2021) पार पडत आहे. काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक पार पडत आहे. गुप्त मतदान पद्धतीने ही निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे ही निवडणूक जर बिनविरोध झाली नाही तर महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारसमोरील आव्हान वाढू शकते. ही निवडणूक जिंकणे हे सरकारसाठी मोठे कसोटीचे असणार आहे. जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम.

निवडणूक कार्यक्रम

  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी- 9 ते 16 नोव्हेंबर
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी- 22 नोव्हेंबर
  • मतदान- 29 नोव्हेंबर

विधानपरिषदेत गुप्तमतदान पद्धीतने ही निवडणूक पार पडती आहे. सत्तेत असलेल्या महाविकासआघाडी सरकारला सध्यास्थितीत 170 आमदारांचा पाठींबा आहे. दोन वर्षांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत महाविकासआघाडीला 169 मते मिळाली होती. मात्र, आता बराच काळ बदलला आहे. त्यामुळे गुप्तमतदान पद्धतीत आमदार पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतीलच याची शाश्वती नाही. गुप्त मतदान पद्धतीत ही शाश्वती कोणालाही देता येत नाही. (हेही वाचा, Sanjay Raut Statement: शिवसेना आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शाप्रमाणे काम करते, खासदार संजय राऊतांचे वक्तव्य)

दरम्यान, ही निवडणुक बिनविरोध करायची तर काँग्रेसला मोठी मेहनत करावी लागेल. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना साकडे घालावे लागेल. पण विरोधी पक्ष असलेल्या भाजपलाही हातापाया पडावे लागेल. जर निवडणुक पार पडलीच आणि काँग्रेसच्या उमेदवाराला कमी मते मिळाली तर महाविकासआघाडीमध्ये सर्वच काही अलबेल नाही. हे सरकार केव्हाही कोसळू शकतो असा संदेश जाऊ शकतो. जो सरकारसाठी भलताच त्रासदायक ठरु शकतो. त्यामुळे ही निवडणूक सर्वांसाठीच महत्त्वाची ठरली आहे.