Liquor | Image used for representational purpose | (Photo Credit: Wikimedia Commons)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर जवळजवळ 30 लाखांपर्यंत घरपोच दारुची डिलिव्हपी करण्यात आली आहे. तर 15.6 टक्के ऑर्डर पेक्षा अधिक 50 टक्के दारु ही एकट्या मुंबईतून मागवण्यात आल्याने राज्याच्या उत्पादन शुक्ल विभागाने म्हटले आहे. मुंबईत दारुची घरपोच विक्री 15 मे पासून करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर राज्यातील काही अन्य ठिकाणी सुद्धा दारुची विक्री सुरु करण्यात आली. तसेच महिन्यातील महसूल सुद्धा दारु विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर वाढला आहे. जुन महिन्यात एकूण 850 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून तो महिन्याभराच्या 70 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. लॉकडाऊन पूर्वी महिन्याभरात 1,100-1,200 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला पण एप्रिल महिन्यात तोच शून्य रुपये होता.

उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, दारुच्या माध्यमातून उत्पादन आणि सेल्स टॅक्स 4 मे ते 6 जुलैपर्यंत 2,400 कोटी रुपयांवर गेला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दारुच्या दुकानाबाहेरील होणाऱ्या गर्दीवर सुद्धा बंदी घालण्यात आली. अधिकाऱ्यांच्या मते राज्यात जवळजवळ 1.4 लाख दारुसाठी परमिट्स हे अवघ्या दोन महिन्यात खरेदी करण्यात आले. कारण सरकारने दारु खरेदी करण्यासाठी आणि घरपोच विक्री करण्यासाठी परमिट असणे अनिवार्य केले होते. मुंबईत सर्वाधिक परमिट्स खरेदी करण्यात आल्याचे ही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.(मुंबई: आरे कॉलनीत सुरु असलेल्या Weekend पार्टीवर पोलिसांची धाड, 33 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल)

फक्त मुंबई आणि नागपूरसाठी होम डिलिव्हरी करणे अनिवार्य असून दुकानात जाऊन खरेदी करण्यावर बंदी आहे. मुंबई उपनगरासह शहरातून दिवसाला 30-40 अॅप्लिकेशन्स येतात. मात्र जेव्हा दारुची घरपोच डिलिव्हरी करण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर तब्बल 400-500 अॅप्लिकेशन आल्याने सर्ववर त्याचा परिणाम सुद्धा झाला होता. दारुची होम डिलिव्हरी केली जात असल्याने परमिट्स खरेदी करण्याऱ्यांची सुद्धा प्रचंड वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपुर व्यतिरिक्त 7,872 दुकानांकडून दारुची दरदिवसाला विक्री केली जाते. तसेच राज्य सरकारने 3 टक्के उपस्थितीसाठी परवानगी दिल्यानंतर 6,722 परमिट्स रुम सुद्धा सुरु करण्यात येऊ शकतात. त्याचसोबत स्टँड अलोन बार आणि रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते.