मुंबईतील आरे कॉलनीतील (Aarey Colony) रॉयल पाम्स (Royal Palms) येथील काही बंगल्यांमध्ये विकेंड पार्टीचे (Weekend Party) आयोजन करण्यात आले होते. या पार्टीवर पोलिसांनी शनिवारी धाड टाकत 33 जणांच्याविरोधात आपत्ती कायदा व्यवस्थापन, महारोग कायद्यासह IPC अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. त्यांनी असे म्हटले होते की, संध्याकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान चार बंगल्यांमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.(पुणे: इंजिनिअर तरुणाची आत्महत्या; व्हॉट्सअॅपवर ठेवले होते स्टेटस 'मी दुसऱ्या जगात जात आहे')
पार्टीसाठी उपस्थिती लावणाऱ्या व्यक्तींकडून सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन करत मास्क सुद्धा घातले नव्हते. पार्टीसाठी आलेले सर्वजण स्विमिंगपूल मध्ये त्याचा आनंद घेताना दिसून आल्याचे सब- इन्सपेक्टर विनोद पाटील यांनी म्हटले आहे. या प्रकरणी 33 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत हे विविध शहारांमधून पार्टीसाठी आले होते. यामधील काहीजण गुजरातचे रहिवाशी असल्याचे ही समोर आले. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस नुतन पवार यांनी असे म्हटले आहे की, या बंगल्यात सुरु असणाऱ्या विकेंड पार्टीबाबत बंगल्याच्या मालकाला माहिती होती का याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. (वसई: 69 वर्षीय महिलेला स्कॉटिश पायलट सोबतची मैत्री पडली महागात, गमावले तब्बल 57 लाख रुपये)
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळजवळ 150 लोक या बंगल्यात पार्टीसाठी दुपारीच आले होते. येथील बंगले विकेंड्सच्या वेळी भाड्याने दिले जातात. परंतु लॉकडाऊनच्या काळात पोलिसांकडून अशा पद्धतीच्या लहान पार्ट्यांवर सुद्धा धाड टाकत कारवाई केली आहे. स्थानिक नगरसेवक उज्ज्वला मोडल यांनी असे म्हटले आहे की, लॉकडाऊन असताना सुद्धा अशा पद्धतीच्या पार्टीसाठी ऐवढ्या लोकांना एकत्रित पाहून धक्का बसला आहे.