Budget 2024 | Twitter

महायुती सरकार मध्ये आज अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थसंकल्प (Interim Budget) मांडला आहे. आजच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि उद्योगांवर भर देण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळेस त्यांनी केंद्राकडून जीएसटीचे  8 हजार 618 कोटींचा परतावा मिळाल्याची माहिती दिली आहे. तसेच दावोस मध्ये  जानेवारी 2024 मध्ये 19 कंपन्यांसोबत करार झाला असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. यंदा १०वा अर्थसंकल्प सादर करणार आहे. Maharashtra Interim Budget 2024 Live Streaming: अर्थमंत्री अजित पवार सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प; इथे पहा लाईव्ह .

महाराष्ट्र अंतरिम अर्‍थसंकल्प 2024 मधील महत्त्वाच्या घोषणा  

  • ईस्टर्न फ्री वे चा विस्तार ठाण्यापर्यंत होणार
  • राज्यातील गुंतवणूक वाढवण्यावर भर
  • जुन्नर मध्ये शिव संग्रहालय उभारणार
  • सोलापूर- तुळजापूर- धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं भूसंपादन पूर्ण
  • नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा मार्च 2025 पासून होणार सुरू
  • वस्त्रोद्योग धोरणा अंतर्गत शिधा पत्रिकेवर एक साडी मिळणार
  • सामान्य प्रशासन विभागाला 1 हजार कोटींची तरतूद
  • मिहान प्रकल्पासाठी 100 कोटींची तरतूद
  • 8 लाख सौर प्रकल्प उभारणार असून 300 युनिट्स पर्यंतची वीज मोफत
  • उर्जा विभागासाठी 11 हजार 934 कोटींची तरतूद
  • राज्य सरकार कडून 7 हजार मेगावॅट उर्जा निर्मिती केली जाणार
  • वीज उपलब्ध नसलेल्या ३७ हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच देण्यात येतील
  • मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी योजना'
  • महिलांना 5 हजार  'पिंक रिक्षा' उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना
  • 1 लाख महिलांना रोजगार देणार
  • ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू होणार
  • आंगणवाडीच्या रिक्त जागा भरणार
  • कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांची उभारणी होणार
  • अयोध्या आणि श्रीनगर मध्ये महाराष्ट्र भवन उभारणार
  • मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळवून  देण्यासाठी प्रयत्न सुरू

दरम्यान आज अर्थसंकल्पामध्ये अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. मागील वर्षी महाराष्ट्र सरकार कडून 2023 मध्ये, एकनाथ शिंदे-भाजप सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 5,47,450 कोटी रुपयांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला, जो “पंचामृत” तत्त्वावर आधारित होता. आजचा अर्थ संकल्प अंतरिम होता.