अर्थमंत्री अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादार करणार आहेत. महायुती सरकार मधील आज ते पहिल्यांदा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान हे निवडणूकींचं वर्ष असल्याने अर्थसंकल्प हा अंतरिम असणार आहे. पुढील 4 महिन्यांसाठी सरकारला खर्चाला लागणार्या पैशाची तरतूद केली जाते. सामान्यपणे या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही नव्या योजनांची घोषणा केली जात नाही. मात्र राज्यासमोरील प्रश्न पाहता अर्थमंत्री आज अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कोणती घोषणा करणार? याकडे जनतेचं लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या अधिकृत युट्युब चॅनेल सह अन्य टेलिव्हिजन चॅनल वर देखील पाहता येणार आहे.
पहा महाराष्ट्र राज्य अंतरिम अर्थसंकल्प 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)