Kirit Somaiya And Anil Deshmukh (Photo Credit:Facebook/ANI)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा (Sushant Singh Rajput Death Case) तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्वपूर्ण निकाल दिला आहे. याव्यतिरिक्त सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणावरून विरोधीपक्षातील नेत्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले आहे. यातच भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्य सरकार हल्लाबोल केला आहे. तसेच सुशांत सिंह प्रकरणात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केली आहे.

“सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यायला हवा. मुंबई पोलीस आयुक्तांनी 2 महिने एफआयआर दाखल करून न घेणे, हे दुर्देवी आहे. यातून ठाकरे सरकार काही बोध घेईल, अशी आशा आहे. सुशांत सिंह राजपुतच्या कुटुंबीयांना आता न्याय मिळेल,” असे सोमय्या म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput Death प्रकरणात रिया चं नाव घेतंं भाजप नेते संंबित पात्रा यांचा महाराष्ट्र सरकारला टोला, पहा ट्विट

किरीट सोमय्या यांचे ट्वीट-

किरीट सोमय्या यांच्या मागणीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राजीनाम्याची बाब पुढे आली तर ती दिल्लीपर्यंत जाईल. नेहमी सत्य आणि न्यायाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य चालते. तसेच सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस योग्य तपास करत होती. कायद्यापेक्षा कोणीच मोठे नाही. सध्या जे आरोप केले जात आहेत ते योग्य नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.