Sushant Singh Rajput Death प्रकरणात रिया चं नाव घेतंं भाजप नेते संंबित पात्रा यांचा महाराष्ट्र सरकारला टोला, पहा ट्विट
Sambit Patra (Photo Credits: Twitter)

Sushant Singh Rajput Death Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यु (Sushant Singh Rajput Case) प्रकरणाचा तपास आता सीबीआय (CBI) कडे सोपावण्याचा निर्णय आज 19 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुनावला आहे. या प्रकरणात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज ( बुधवार, 19 ऑगस्ट 2020) अंतिम निर्णय सुनावला आहे. पाटण्यामध्ये (Patna) नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) देण्याची रिया चक्रवर्तीची (Rhea Chakrobarty) याचिका न्यायालयाने फेटाळुन लावली आहे. यावरुन अनेकांनी आनंंद व्यक्त करत तर काहींनी महाराष्ट्र सरकारची (Maharashtra Government) कानटोचणी करत प्रतिक्रिया दिली आहे. यात भाजपा (BJP) नेते संबित पात्रा (Sambit Patra)  यांचा सुद्धा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर रिया चक्रवर्तीच्या नावावरून राज्य सरकारला डिवचत संबित पात्रा यांंनी एक खास ट्विट केले आहे.Sushant Singh Rajput Case: अभिनेत्री अंकिता लोखंडे ने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास CBI कडे देण्याच्या आदेशावर केले 'हे' ट्वीट

संबित पात्रा यांनी महाराष्ट्र सरकारला निशाणा करत “सुनने में आया है महाराष्ट्र सरकार अब रो ‘रिया’ है!,” असं ट्विट केलं आहे. सुशांंतच्या प्रकरणात मुंंबई विरुद्ध बिहार पोलिस हा सर्व वाद सुरु असल्यापासुन अनेकजण महाराष्ट्र सरकार रियाला वाचवण्यचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत होते यावर काहीही ठोस माहिती पुढे आली नसली तरी संबित पात्रा यांंनी आपल्या ट्विट मधुन राज्य सरकारला चिमटा घेतलाय. बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर भाष्य करण्याची रिया चक्रवर्ती ची लायकी नाही'- Bihar DGP गुप्तेश्वर पांडे यांची प्रतिक्रिया

संंबित पात्रा ट्विट

दरम्यान, याच प्रकरणात भाजप महाराष्ट्र नेते नारायण राणे यांंनी सुद्धा महाराष्ट्र सरकारने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे तर किरीट सोमय्या यांंनी तर गृहमंंत्री अनिल देशमुख यांनी या अपयशानंतर राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली आहे. या प्रकरणार महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारुन पुढील भुमिका स्पष्ट करु असे सांगितले आहे.