Sushant Singh Rajput Case: 'बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर भाष्य करण्याची रिया चक्रवर्ती ची लायकी नाही'- Bihar DGP गुप्तेश्वर पांडे  यांची प्रतिक्रिया
Bihar DGP Gupteshwar Pandey| Photo Credits: Twitter/ ANI

सर्वोच्च न्यायालयाने आज अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आतमहत्येचं प्रकरण तपासासाठी सीबीआय सोपावण्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान यामुळे राजपूत कुटुंब आणि त्याच्या चाहत्यांच्या सीबीआय चौकशीच्या (CBI Probe) मागणीला यश आलं आहे. अशामध्ये महाराष्ट्र आणि बिहार मध्ये राजकीय वातावरण देखील तापले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आता पटना मधील एफआयआर देखील योग्य असल्याचं म्हटल्याने बिहार पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे. मीडियाशी बोलताना बिहार डीजीपी गुप्तेश्वर पांडे (Bihar DGP Gupteshwar Pandey)  यांनी 'बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर भाष्य करण्याची रिया चक्रवर्ती ची लायकी नाही' अशी प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार म्हणतात 'सत्यमेव जयते', सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सूचक ट्विट.  

बिहार डीजीपींकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी बिहारच्या पोलिसांना क्वारंटीन केले होते. ते चूकीचे होते. सुप्रिम कोर्टाचा निर्णय सर्वमान्य असेल. आम्ही योग्य असताना आमच्यावर आरोप करण्यात आले असे मत देखील त्यांनी यावेळेस बोलून दाखवले.

दरम्यान 2 महिन्यांपूर्वी सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं होतं. त्याची आत्महत्या नेमकी कशामुळे झाली? याचं कोडं अद्याप उलगडू शकलेले नाही. आता हा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआय कडे गेला आहे. त्यामध्ये आता कोणतीही एफआयआर आल्यास तपास सीबिआय करेल. मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावं असे सांगण्यात आले आहे.