महाराष्ट्र राज्यात एकूण 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली; वाचा सविस्तर
President's Rule (Photo Credits: File Image)

महाराष्ट्र राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट आज संध्याकाळी लागू करण्यात आले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यावर निर्णय घेत राष्ट्रपतींकडे त्यावर आदेश देण्याची शिफारस केली. अखेर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणली.

परंतु महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची ही पहिलीच वेळ नसून राज्याचा इतिहास पहिला तर या आधीही अशी परिस्थिती तब्बल दोन वेळा उदभवली आहे. या आधी 1980 आणि 2014 या दोन साली महाराष्ट्र राज्य राष्ट्रपती राजवटीखाली गेलं होतं.

1980 चा इतिहास

1978 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचं सरकार होतं. मात्र हे सरकार बरखास्त करून विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळेच 17 फेब्रुवारी ते 9 जून 1980 या काळात महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

राष्ट्रपती राजवट म्हणजे नक्की काय व केव्हा लागू होते? वाचा सविस्तर

2014 साली का लागली राष्ट्रपती राजवट?

दुसऱ्यांदा म्हणजे 2014 साली देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. मात्र तेव्हाच कालावधी फक्त 32 दिवसांचा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे बहुमताचा एकदा न गाठू शकल्याने सरकार कोसळलं होतं आणि 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या कालावधीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू; राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी

आता लागलेली राष्ट्रपती राजवट अजून किती काळ?

अद्याप कोणताही पक्ष स्थिर सरकार बनवू शकला नसल्याने अजून किती काळ महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवटीखाली राहावं लागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.