President's Rule (Photo Credits: File Image)

महाराष्ट्र राज्यात अखेर कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करता आली नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नुकतीच राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केलेली आहे.

राज्यपालांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापन करण्याची संधी दिली होती आणि त्यांना आज रात्री ८.३० वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. परंतु राष्ट्रवादी पक्षाकडून आज सकाळी राज्यपालांकडे २ ते ३ दिवसांची मुदत मागण्यात आली होती. राज्यपालांनी ही मुदत वाढवून न देण्याचा निर्णय घेतला आणि अखेर राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली.

राष्ट्रपती राजवट म्हणजे नक्की काय व केव्हा लागू होते? वाचा सविस्तर

आता महाराष्ट्रातील संपूर्ण कारभार हा राजभवांतून चालणार व राज्याची सर्व सूत्र ही राष्ट्रपतींच्या हाती गेली आहेत.

Maharashtra Government Formation Live News Updates

सर्वप्रथम भाजप पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावण्यात आलं होतं. परंतु त्यांनी आसामर्थ्य दाखवल्यानंतर शिवसेनेला ती संधी देण्यात आली. मात्र शिवसेनाही सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करु शकली नाही आणि अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी चोवीस तासांची मुदत देण्यात आली होती.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षा शरद पवार हे वाय. बी. सेंटरवर काँग्रेसच्या नेत्यांची भेट घ्यायला गेले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या आमदारांची भेट घेण्यासाठी मुंबईतील हॉटेल रिट्रीटवर पोहोचले आहेत.