महाराष्ट्र सरकारचा केशरी रेशनाकार्ड धारकांना दिलासा (Photo Credits- Facebook)

देशभरात कोरोनाची (Coronavirus)  परिस्थिती पाहता राज्य सरकारने आता एक महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे. त्यानुसार आता केशरी रेशन कार्ड धारकांना दिलासा देणारी ठरणार आहे. राज्यातील तब्बल 3 कोटी केशरी रेशन कार्डधारकांना 3 किलो गहू 8 रुपये प्रति किलो तर 2 किलो तांदूळ 12 रुपये प्रति किलोने वितरीत करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता केशरी राशन कार्ड (Saffron Ration Card) धारकांना याचा मोठा फायदा होणार आहे. राज्यातील एकूण कोरोनाची परिस्थिती पाहता सरकार सर्वसामान्यांचा विचार करता योग्य ते निर्णय घेत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यावर आलेले कोरोनाचे संकट पाहता नागरिकांना पुरेल ऐवढा अन्नधान्याचा साठा आपल्याकडे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. तसेच नागरिकांना लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवासुविधा सुद्धा उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे म्हटले होते. परंतु नागरिकांनी आपल्या पाहिजे तेवढाचा अत्यावश्यक वस्तूंचा साठा करावे असे ही सांगितले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने मे आणि जून महिन्यासाठी 3 कोटी केशरी रेशकार्ड धारकांना दिलासा आहे. त्यानुसार राज्यात सुमारे साडेचार लाख मेट्रिक टन गहू व तांदूळचे वितरण करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.(पुणे मध्ये प्लाझ्मा थेरपीची तयारी पूर्ण; 'ससून' हॉस्पिटलमधून येत्या 2-3 दिवसांत सुरूवात होण्याची शक्यता)

दरम्यान, महाराष्ट्रात स्वस्त धान्य दुकानांमधून 1 कोटी 52 लाख 12 हजार शिधापत्रिका धारकांना 63 लाख 65 हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 5 कोटी 59 लाख 57 हजार लोकांना 27 काळ 97 हजार 870 क्विंटल तांदळाचे मोफत वाटप करण्यात आले आहे. याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच सरकारने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर स्थलांतरित कामगार वर्गासाठी शेल्टर होमची सुद्धा सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.