Maharashtra Government Formation: भाजपला राज्यात बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र आता राज्यात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला 30 नोव्हेंबरला वेळ राष्ट्रपती भगत सिंग कोश्यारी यांच्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता भाजप बहुमताचा आकडा पार करण्यासाठी कशाप्रकारे जुळवाजुळव करणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचसोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची कमान स्विकारली असून ते किती आमदरांना आपल्या सोबत घेऊन येणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. पण या सर्व परिस्थितीत शिवसेनेच्या घोटात अस्थिरता निर्माण झाली असून त्यांचे 16-17 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे समोर येत आहे.

भाजपला राज्यात बहुमत सिद्ध करण्यासाठी बहुमताचा आकडा पार करणे अत्यावश्यक आहे. विधानसभा निवडणूकीत एकट्या भाजपला 105 जागांवर विजय मिळवता आला आहे. मात्र आता बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 चा आकडा गाठण्यासाठी जवळ 30-40 आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बहुमताचा आकडा एकत्र पार करण्यासाठी काय प्रयत्न करणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.(संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना पक्षाचे नुकसान झाले- चंद्रकांत पाटील)

 विधानसभा निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर भाजप-शिवसेना पक्षात सत्ता स्थापनेवरुन वाद दिसून आले. त्याचसोबत शिवसेनेने आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री असावा अशी मागणी केली. परंतु भाजपने यावर कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर सुद्धा सत्ता स्थापनेसाठी वेळ देऊ करण्यात आला. तरीही काही निष्पन्न न झाल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी पक्षासोबत जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. परंतु शुक्रवार पर्यंत स्पष्ट झालेल्या सत्ता स्थापनेच्या तिढ्यावर तोडगा निघाल्यानंतर शनिवारी राजकरणाची समीकरणे बददली असल्याचे दिसून आले.