महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात मोठा भूकंप झाला असून अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवणी केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, अशी मोठी चर्चा रंगली होती. मात्र, मुंबई येथील राजभवनामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर, अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपत दिल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यानंतर भाजप (BJP) नेता चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना (ShivSena) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी आता तरी गप्प राहिले पाहिजे. संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना पक्षाचा नाश झाला आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.
एएनआयचे ट्वीट-
Chandrakant Patil, Maharashtra BJP President: Sanjay Raut should now at least keep silent. He has ruined Shiv Sena. pic.twitter.com/6G6W3q290B
— ANI (@ANI) November 23, 2019