खरीप हंगाम 2018 मध्ये 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या महराष्ट्र राज्यातील उर्वरित 4518 गावांमध्ये दुष्काळ (Drought) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गावांमध्ये आठ सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मदत व पुर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Pati) यांनी ही घोषणा केली आहे. केद्राच्या दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार, राज्यात 151 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 75% पेक्षा कमी पाऊस आणि एकूण पावसापेक्षा 750 मीमी हून कमी पाऊस झालेल्या भागामध्ये राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ: राज्य सरकार सरसकट चारा छावण्या उभारणार नाही, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करु : महादेव जानकर
कोणकोणत्या तालुक्यातील गावामध्ये जाहीर करण्यात आला दुष्काळ?
धुळे (50 गावं)
नंदूरबार (195 गावं)
अहमदनगर (91 गावं)
नांडेड (549 गावं)
लातूर ( 159 गावं)
पालघर (203 गावं)
पुणे (88 गावं)
सांगली (33 गावं)
अमरावती (731 गावं)
अकोला (261गावं)
बुलढाणा (18 गावं)
यवतमाळ (751 गावं)
वर्धा (536 गावं)
भंडारा (129 गावं)
गोंदिया (13 गावं)
चंद्रपूर (503 गावं)
गडचिरोली (208 गावं)
दुष्काळग्रस्त भागामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आली आहे त्यासोबतच पाणी पुरवठ्यासाठी टॅंकर पोहचवण्याची सोय देण्यात येणार आहे. पाणी टंचाई जाहीर करण्यात आलेल्या गावांमध्ये शेत पंपाची वीज न तोडण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.