राज्यात आज घडीला कोराना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या 40 इतकी आहे. त्यात 26 पुरुष, 14 महिलांचा समावेश आहे. सर्वांचीच प्रकृती वाईट नाही. केवळ एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. मुंबई लोकल बंद करण्याचा, अथवा सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सीओव्हीआयडी-19 (COVID-19) बाधित रुग्णांपैकी एकाचा दुर्दैवाने आज सकाळी मृत्यू झाला.
सध्यास्थितीत तरी मुंबई लोकल बंद केली जाणार नाही. राज्यातील नागरिक सजग आहेत. त्यामुळे ते स्वत:हून गर्दी टाळतील. जनतेने सहकार्य केल्यास कठोर निर्णय घ्यावे लागणार नाहीत. जनतेने जर स्वत:हून सहकार्य केले नाही तर, सरकारला नाईलाजाने कठोर कारवाई करावी लागेल असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus: राज्यातील सर्व सरकारी कार्यालयं 7 दिवस राहणार बंद, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कचेऱ्या मात्र सुरु- सूत्र)
एएनआय ट्विट
Maharashtra CM Uddhav Thackeray: Trains and buses are essential services so we are not stopping them as of now but if people don't listen to our advice and don't avoid unnecessary travel, then we will think about that too. Next 15-20 days are very crucial for us. #Coronavirus https://t.co/hXumGcPxq8
— ANI (@ANI) March 17, 2020
Corona Virus मुळे पंढरपूर, शिर्डीसह राज्यातील राहणार 'ही' 15 मोठी मंदिरं बंद : Watch Video
पुण्यातील काही खासगी व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय स्वत:हून घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. मुंबईतील व्यावसायिकांनीही असा निर्णय घ्यावा, असे अवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केेल आहे.