कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारी कार्यालयं पुढचे 7 दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे वृत्त आहे. सरकारी कार्यालयं 7 दिवस बंद राहणार असली तरी, अत्यावश्यक सेवा मात्र त्यातून वगळण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक मुंबई (Mumbai) येथे सुरु आहे. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. ही बैठक अद्याप सुरु आहे. दरम्यान, सरकारी कार्यालये बंद ठेवण्याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
कोरना व्हायरस आटोक्यात राहावा. त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन प्रयत्नशिल आहे. या प्रयत्नांचाच भाग म्हणून राज्यातील शहर आणि गरज पडल्या ग्रामिण भागातील सर्व शाळा, अंगणवाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, चित्रपटगृहं, तरणतलाव, मॉल आणि हॉटेल्स (पुणे) बंद ठेवण्याचा निर्णय या आधीच घेण्यात आला आहे. आता मुंबई लोकल बंद करण्याबाबतचाही निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
दरम्यान, मुंबई शहराची वाहीणी अशी ओळख असलेल्या मुंबई लोकलची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर वाढविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर आगोदर प्रति तिकीट 10 रुपये इतका होता. आता त्यात 40 रुपयांची वाढ करुन तो प्रति तिकीट 50 रुपये इतका करण्यात आला आहे. तिकीट दर वाढल्यामुळे नागरिक तिकीट फारसे खरेदी करणार नाहीत. परिणामी गर्दी नियंत्रणात राहिली, असा त्यामागचा विचार आहे. (हेही वाचा, Coronavirus: मुंबई लोकल प्लॅटफॉर्म तिकीट दर 40 रुपयांनी वाढले, प्रति तिकीट मोजावे लागणार 50 रुपये)
दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने COVID-19 संक्रमीत रुग्णांची आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत 126 जणांना कोरोना व्हायरस (COVID-19) संक्रमण झाले आहे. हिच संख्या काल 114 इतती होती. देशभरातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळेच देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकार कोरोना व्हयारस नियंत्रणासाठी अधिक गंभीर आहे.