मी म्हणजे काही डोनाल्ड ट्रम्प नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत रोखठोक भाष्य (Watch Video)
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना संकटकाळात (Coronavirus) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांनी जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी नुकतीच शिवसेनेचे मुखपत्र सामना चे संपादक संजय राऊत यांना मुलाखत दिली. यावेळी लॉकडाऊन (Lockdown) पासून ते राज्यातील कोरोना परिस्थितीसह, सर्व मुद्द्यांवर ठाकरे यांनी भाष्य केले. ही मुलाखत 25, 26  जुलै रोजी दोन टप्प्यात दाखवली जाणार आहे नुकताच संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून त्याचा प्रोमो आपल्या ट्विटर अकाऊंटला शेअर केला आहे. यावेळीच्या प्रोमो मध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वतःमधील आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump) यांच्यातील फरक सांगितला आहे. राऊत यांनी लॉकडाऊन संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मी काही डोनाल्ड ट्रम्प नाही, मी माझी माणसं डोळयासमोर तळमळताना पाहू शकत नाही असे म्हणत लॉकडाऊनचे समर्थन केले आहे.

काय म्हणतंय ठाकरे सरकार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनी घेतलेली दिलखुलास मुलाखत कुठे आणि कधी पाहता येईल, वाचा सविस्तर

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात लष्कर बोलावण्याची वेळ आली होती का ? मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार ? मंत्रालयात कमी गेल्याचा आरोप लागणार, या सर्व प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारल्या आहेत. या सर्व प्रश्नांनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा बेधडक उत्तरे देताना दिसत आहेत. याशिवाय अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुद्धा ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे मात्र त्यात ते नेमके काय सांगतात हे पाहण्यासाठी 25 तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल.

संजय राऊत ट्विट

दरम्यान, सुरुवातीपासूनच आपण कोरोनाची परिस्थिती आहे तशी मांडत आहोत, खोटी आशा देणार नाही, परिस्थिती गंभीर आहे, कोरोनाचा आपण सामना करायचा आहे. हे संकट कधी संपेल माहित नाही म्हणून आपणच शहाणं व्हायला हवं अशा आशयाची भूमिका उद्धव ठाकरे यांनी याही मुलाखतीतून मांडली आहे. येत्या 25 आणि 26 जुलै ला सामनाच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर पाहता येईल.