लॉकडाऊन (Lockdown), राम मंदिर (Ram Mandir), कोरोना व्हायरस (Coronavirus), राजकारणातील घडामोडी यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी सर्व जनता उत्सुक आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेणार आहे. 'काय म्हणतंय ठाकरे सरकार' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संजय राऊत ही मुलाखत घेणार आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेक विषयांवर चर्चा करतील, आपले मत मांडतील असे सांगण्यात येत आहे.
येत्या 25 आणि 26 जुलै ला सामनाच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर पाहता येईल. त्यामुळे या मुलाखतीचा तुम्हाला एक भाग बनायचा असेल तर येथे क्लिक करा.
हेदेखील वाचा- Ram Mandir Bhumi Pujan: राम जन्मभूमी अयोध्येचा रस्ता शिवसेना पक्षानेच तयार केला; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दावा
पाहा व्हिडिओ:
काय म्हणतेय ठाकरे सरकार?
मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांची दिलखुलास मुलाखत. pic.twitter.com/4SLPc70ara
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 21, 2020
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या मुलाखतीत सर्वच प्रश्नांची दिलखुलास उत्तरे मिळाली असे संजय राऊतांनी सांगितले आहे. तसेच यात घेण्यात आलेली उद्धव ठाकरे यांची 'दिल की बात' यातून राजकारण चांगल ढवळून निघेल. कोरोना व्हायरस ते राम मंदिराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलले हे येत्या 25,26 जुलै ला सर्वांना कळेल. त्यामुळे अनेकांना कार्यक्रमाची उत्सुकता लागून राहिली आहे.