Sanjay Raut | (Photo Credits: Twitter)

उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन (Ram Mandir Bhumi Pujan)  ऑगस्टला पहिल्या आठवड्या पार पडणार आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असून यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निमंत्रण दिले आहे का? या प्रश्नावर बोलताना शिवसेना (Shiv Sena) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. अयोध्या आणि शिवसेना पक्षाचे जुने नाते असून ते राजकीय नाही. राजकारणासाठी आम्ही अयोध्येला जात नाही आणि गेलो नाही. तसेच राम जन्मभूमी अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून केलेल्या विधानानंतर भाजपचे अनेक नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आम्हाला वाटते की कोरोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटते की मंदिर बांधून करोना जाईल”,असा टोला अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी मोदी सरकारला सोलापूर येथील दौऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला होता. त्यानंतर महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. नुकतीच संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. दरम्यान, राम मंदिराचे भूमिपूजन होणार असून यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही गेले होते आणि झाल्यावरही गेले. उद्धव ठाकरे हे नेहमी अयोध्येला जातात. अयोध्येचा रस्ताच शिवसेनेने तयार केला आहे. अयोध्येच्या रस्त्यावरील अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत, ते राजकारण म्हणून नाही. अयोध्या आणि शिवसेनेचे नाते कायम आहे. राजकारण म्हणून नाही तर श्रद्धा आणि हिंदुत्त्व या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान केले आणि ते कायम राहील,” असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. हे देखीला वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिर भूमिपूजनासाठी शरद पवाराच्या NOC ची गरज नसावी- प्रवीण दरेकर

“कोरोनाची लढाई पांढऱ्या कपड्यातील देवदूत लढत आहेत. उद्धव ठाकरेंनी याआधी सांगितले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील कबुली दिली आहे. देशातील लाखो डॉक्टर, पोलीस, नर्स, वॉर्डबॉय अशा सगळ्यांचे कोरोनाशी लढताना आपले कर्तव्य बजावत आहे. ही लढाई देवाच्या आशिर्वादाने तेच लढतील”, असे संजय राऊत हे शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून बोलत होते.