CM Uddhav Thackeray |(Photo Credits: Twitter )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील घटकपक्षांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा (Varsha Bungalow) बंगल्यावर ही बैठक पार पडणार आहे. ही बैठक नेमकी कोणत्या कारणासाठी बोलावण्यात आली आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, राज्यातील वाढती कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या, संपत आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) कालावधी, राज्याची आर्थिक स्थिती, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सुरु झालेला राजकीय संघर्ष यांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्याता आहे.

प्राप्त माहितीनुसार, महाविकास आघाडीमधील मंत्री आणि सचिव या बैठकीला उपस्थित राहाणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर पार पडत असलेली ही बैठक सकाळी 11 वाजता सुरु हण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपले खासगी निवस्थान मातोश्री येथून व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सहभागी होऊ शकतात. (हेही वाचा, राजभवनातील गंजलेल्या तोफांतून सरकार पाडणार असल्याचे मनसुबे कोणी रचू नयेत- शिवसेना)

एएनआय ट्विट

विरोधी पक्षाकडून सरकारला वारंवार लक्ष्य केले जात आहे. तसेच, कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात हे सरकार अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप आहे. या आरोपाला सामोरे जाण्यासाठी तसेच, केंद्र सरकारकडून अधिक सहकार्य मिळविण्यासाठी अधिक काय रणनिती या बैठकीत आखली जाते का, याबाबत उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला तोंडावर आलेला पावसाळा, पावसाळ्यात नेहमीच होणारी नागरिकांची गैरसोय, तुंबणारी मुंबई आदींवर काही चर्चा होते का याबाबत उत्सुकता आहे.