Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 15, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago
Live

Maharashtra Cabinet Expansion Live News Updates: मंत्रिमंडळ विस्तारानंतर ठाकरे सरकारचे पहिली बैठक; अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासहित सर्व नेते मंडळी उपस्थित

महाराष्ट्र Siddhi Shinde | Dec 30, 2019 04:25 PM IST
A+
A-
30 Dec, 16:24 (IST)

ठाकरे सरकारच्या नवनिर्वाचित कॅबिनेट व राज्य मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता एक खास बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये खातेवाटपावर चर्चा होऊ शकते. बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासहित शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची दिग्गज नेते मंडळी उपस्थित आहेत. 

30 Dec, 14:29 (IST)

शिरोळ मतदारसंघाचे आमदार ,अपक्ष नेते राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्य मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार कार्यक्रम संपन्न झाला आहे . 

 

30 Dec, 14:27 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्य मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

 

30 Dec, 14:24 (IST)

उदगीपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत नेते  संजय बनसोडे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्य मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून बनसोडे पक्षासोबत आहेत. 

30 Dec, 14:22 (IST)

सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे हिने आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्य मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचा तरुण चेहरा  म्ह्णून आदिती कडे पहिले जाते. रायगडच्या राजकारणात सक्रिय सहभागामुळे 2019 च्या निवडणुकीत तब्बल 40हजाराच्या फरकाने आदिती हिने विजय मिळवला होता, 

30 Dec, 14:19 (IST)

इंदापूर मतदारसंघाचे विजयी आमदार व अजित पवार यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेस नेते दत्तात्रय भरणे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्य मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

30 Dec, 14:17 (IST)

सांगली येथील पलूस- कडेदार मतदारसंघाचे विजयी आमदार आणि युवक काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजीत कदम आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्य मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

30 Dec, 14:15 (IST)

अचलपूर, अमरावती येथील कणखर नेतृत्व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्य मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. यंदाच्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुरु असताना बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. 

30 Dec, 14:14 (IST)

1986 पासून सक्रिय राजकारणात प्रवेश घेतलेले शंभूराज देसाई यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्य मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. पाटण मतदारसंघातून त्यांना 2004 , 2009 आणि 2019 साली बहुमत प्राप्त झाले होते. 

30 Dec, 14:11 (IST)

काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सत्तेज पाटील  यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्य मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. कोल्हापूर मधील काँग्रेसचे ते मुख्य नेते आहेत. 

Load More

महाराष्ट्रातील (Maharashtra) शिवसेना (Shivsena) ,काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) च्या महविकास आघाडी सरकारचा आज, 30 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार जाहीर होणार असून यात पक्षांचे एकूण 36 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी कडे 13 -13 मंत्रीपदे देण्यात येणार असून काँग्रेसचे 10 मंत्री शपथ ग्रहण करतील. दुपारी 1 वाजता या शपथविधीला सुरुवात होणार असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) या मंत्र्यांना शपथ देतील. दरम्यान, अलीकडेच ठाकरे सरकारने दिलेल्या कर्जमाफी निर्णयावरून नाराज असल्याने या कार्यक्रमावर विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar)  यांनी बहिष्कार टाकला आहे तर दरेकर यांच्या सहित भाजप (BJP) नेत्यांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.CM Uddhav Thackeray Cabinet Expansion: अजित पवार पुन्हा होणार उपमुख्यमंत्री? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार

निवडणूक,सत्तासंघर्ष , मुख्यमंत्री पदी नेमणूक या साऱ्या नंतर ठाकरे सरकारचा प्रलंबित मंत्रिमंडळ विस्तार अखेरीस पार पडणार असल्याने या सोहळ्याची रविवार पासूनच जय्यत तयारी सुरू होती. विधिमंडळ परिसरातील पार्किंगच्या जागेतच मुख्य स्टेज आणि त्याला लागूनच भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सुमारे 500 ते 700 आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपामध्ये १२ पेक्षा जास्त स्क्रीन उभारण्यात आले असून विधिमंडळ परिसरात पोलिसांची कडक सुरक्षा तयार करण्यात आली आहे.

दरम्यान, काल रात्री उशिरापर्यंत मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरून चर्चा सुरु होती. यामध्ये घटक पक्षातील अपेक्षित उमेदवारांना संधी न मिळाल्याने काहीसे नाराजीचे वातावरण आहे

तर, राष्ट्रवादीकडून संभाव्य मंडळींमध्ये  उमेदवारांमध्ये अजित पवार, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. किरण लहामटे, आदिती तटकरे यांच्या नावांचा समावेश आहे

शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, सुनील प्रभू, अनिल परब, शंभुराजे सरप्रताप सरनाईक किंवा रवींद्र फाटक, रवींद्र वायकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, उदय सामंत, भास्कर जाधव किंवा वैभव नाईक, आशीष जैस्वाल किंवा संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड ही मंडळी शपथ घेऊ शकतील.

काँग्रेस कडून अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, संग्राम थोपटे, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, के. सी. पाडवी, अमिन पटेल, यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची चर्चा आहे.


Show Full Article Share Now