CM Uddhav Thackeray Cabinet Expansion: अजित पवार पुन्हा होणार उपमुख्यमंत्री? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार
Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

Maharashtra Cabinet Expansion: महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची सध्या विधानभवन परिसरात जोरदार तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार आणि कुणाचा पत्ता कापला जाणार याची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान शिवसेना, एनसीपी आणि कॉंग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये आता राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit  Pawar) उपमुख्यमंत्री (Deputy CM) पदाचे प्रमुख दावेदार आहेत. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून आज ते उपमुख्यमंत्री होणार असल्याचे वृत्त आहे. Maharashtra Cabinet Expansion Live News Updates इथे पहा. 

दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील सत्ता कोंडीमध्ये अजित पवार यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. त्यांच्या नाराजीनाट्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अजित पवारांना ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात कोणतं स्थान मिळणार याची चर्चा रंगली होती. आज मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवार राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.

अजित पवार त्यानंतर 1995, 1999,2004, 2009,2014 आणि 2019 असे सलग 6 वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत. यंदा सर्वाधिक मतांच्या फरकाने ते विधानसभेवर निवडून गेलेल आमदार ठरले आहेत.

अजित पवार यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात नोव्हेंबर 2010- सप्टेंबर 2012 आणि डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2014 या काळात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आता अजित पवार पुन्हा तिसर्‍यांदा उप्मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्यांना कथित सिंचन घोटाळा प्रकरणामधूनची क्लिन चीट मिळाली आहे.