Maharashtra Cabinet Ministers List 2019: अशोक चव्हाण, धनंजय मुंडे ते आदित्य ठाकरे; 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री सह महाविकास आघाडीचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार; इथे पहा संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Expansion | Photo Credits: File Photo

CM Uddhav Thackeray Cabinet Ministers List 2019: महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार विधानभवन परिसरात पार पडणार आहे. 1 वाजता होणार्‍या या मंत्रिमंडळाच्या विस्तारा पूर्वी राजभावनातून 36 मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कॉंग्रेसचे अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील यांच्यासह 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यासोबतच राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

दरम्यान 28 नोव्हेंबर दिवशी शिवाजी पार्कवर महाविकास आघाडीच्या सरकारच्या उद्धव ठाकरे यांच्यासह 6 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला होता. इथे पहा महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे लाईव्ह अपडेट्स

महाविकास आघाडीचे कोणते आमदार घेणार आज शपथ

राष्ट्रवादी आमदार

अजित पवार (उपमुख्यमंत्री)

दिलीप वळसे पाटील

धनंजय मुंडे

अनिल देशमुख

हसन मुश्रीफ

राजेंद्र शिंगणे

नवाब मलिक

राजेश टोपे

जितेंद्र आव्हाड

बाळासाहेब पाटील

दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री)

आदिती तटकरे (राज्यमंत्री)

संजय बनसोडे (राज्यमंत्री)

प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री)

शिवसेना आमदार

संजय राठोड

गुलाबराव पाटील

दादा भुसे

संदीपान भुमरे

अनिल परब

उदय सामंत

शंकरराव गडाख

आदित्य ठाकरे

अब्दुल सत्तार (राज्यमंत्री)

शंभराजे देसाई (राज्यमंत्री)

बच्चू कडू (राज्यमंत्री)

राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री)

काँग्रेस आमदार

अशोक चव्हाण

विजय वडेट्टीवार

वर्षा गायकवाड

सुनिल केदार

अमित देशमुख

यशोमती ठाकूर

अस्लम शेख

के. सी. पाडवी

सतेज पाटील (राज्यमंत्री)

विश्वजीत कदम (राज्यमंत्री)

दरम्यान आज विधानभावनावर होणार्‍या शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवार हजर राहणार आहेत. दुपारी 1 च्या सुमारास या सोहळ्याला सुरूवात होणार असून काही नाराज गटांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. या शपथविधी सोहळ्याची मागील काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. आता थोड्याच वेळात या शपथविधी  सोहळ्याला सुरूवात होणार आहे.